Aamir Liaquat Hussain's 3rd Wedding With Syeda Dania Shah Saam TV
देश विदेश

Aamir Liaquat: घटस्फोटाच्या दिवशीच केलं तिसरं लग्न; 49 वर्षांच्या पाकिस्तानी नेत्याने केला १८ वर्षीय तरुणीशी निकाह

Aamir Liaquat Hussain Wedding: त्यांनी लिहिलं की, त्यांची पत्नी खूप गोड, अतिशय सुंदर, साधी आणि प्रिय आहे. 'मी माझ्या सर्व हितचिंतकांना विनंती करतो की त्यांनी आमच्यासाठी प्रार्थना करावी.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इस्लामाबाद: सोशल मीडियावर खासकरुन इंस्टाग्रामवर 'आ हा, व्वा व्वा व्हा...' या मीममध्ये जो व्यक्ती दिसतो, तो कुणी साधा माणूस नाही तर पाकिस्तामधील खासदार असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Pm Imran Khan) यांच्या जवळचा व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं नाव आहे, डॉ. आमिर लियाकत हुसैन (Dr. Aamir Liaquat Hussain). आमिर लियाकत हे भारतातही फेमस आहेत, त्याचं कारण म्हणजे मीम्स (Ah Ha Ha Wah Wah Meme). आता ते एका वेगळ्या कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वय वर्षे ४९ असूनही त्यांनी एका १८ वर्षांच्या तरुणीशी विवाह केला आहे. विशेष म्हणजे हे त्यांचं तिसरं लग्न असून ज्यादिवशी त्यांचा दुसऱ्या पत्नीशी घटस्फोट झाला त्याच दिवशी त्यांनी १८ वर्षांची मुलगी बेगम सईदा दानिया शाह (Syeda Dania Shah) हिच्यासोबत तिसरं लग्न केलं, त्यामुळे आमिर लियाकत हुसैन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (Viral Photo: Aamir Liaquat Hussain's 3rd Wedding With Syeda Dania Shah)

हे देखील पहा -

आमिर लियाकत हुसैन हे एक राजकारणी सांसद तसेच पाकिस्तानचे (Pakistan) लोकप्रिय टीव्ही होस्ट असून ते पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळचे मानले जाताे. आमिर लियाकत हुसैनने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्यांच्या तिसऱ्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की, "काल रात्री 18 वर्षीय सय्यद दानिया शाहसोबत लग्न केले". ती दक्षिण पंजाबच्या लोधरण येथील आदरणीय नजीब उत तरफ़ैन सादात कुटुंबातील आहे." असं म्हणत त्यांनी आपल्या नव्या पत्नीसोबतचा फोटो शेयर केला आहे.

आमिर लियाकत हुसैनने इंस्टाग्राम पोस्टमध्ये आपल्या तिसऱ्या पत्नीचे मनापासून कौतुक केले. त्यांनी लिहिलं की, त्यांची पत्नी खूप गोड, अतिशय सुंदर, साधी आणि प्रिय आहे. 'मी माझ्या सर्व हितचिंतकांना विनंती करतो की त्यांनी आमच्यासाठी प्रार्थना करावी, कारण मी आयुष्यातील वाईट काळ मागे सोडला आहे. तो चुकीचा निर्णय होता. असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दुसरी पत्नीदेखील होती खूपच सुंदर:

आमिर लियाकत हुसैन यांची दुसरी पत्नी सय्यद तुबा (Syeda Tuba Anwar,) देखील खूप सुंदर आहे आणि ती एक अभिनेत्री आहे. आमिर लियाकतने 2018 मध्ये दुसरे लग्न केले होते.

पहिल्या पत्नीला फोनवरून घटस्फोट:

जेव्हा आमिर लियाकत हुसैन यांनी दुसरं लग्न केलं तेव्हा त्याची पहिली पत्नी सईद बुसरा इकबाल हिने आरोप केला होता की, आमिर लियाकतने फोनवरून त्याला घटस्फोट दिला होता.

सईद बुसरा (syeda bushra iqbal) यांनी सांगितले होते की, अमीर लियाकतच्या निर्णयाने त्यांच्या आयुष्यात वादळ निर्माण झाले होते आणि त्यांच्या आयुष्यात अचानक भूकंप कसा आला हे त्यांना समजू शकले नाही. आमिर लियाकतच्या या निर्णयामुळे आपण खूप दुखावलो असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सांगली-मिरजेला गारपिटीचा तडाखा; मुसळधार पावसाने शहर ठप्प

Weight Loss Recipe : वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी अन् चटपटीत पदार्थ, वजन झटपट होईल कमी

Maharashtra News Live Update: राळेगांवमध्ये भाजपचा पोलीस स्टेशनवर मोर्चा

Chanakya Niti: पुरुषांच्या या 6 सवयी करिअर करतात उद्धवस्त, आत्ताच व्हा सावध अन्यथा...

फटाक्यांच्या फॅक्टरीत अग्नितांडव; १३ जणांचा मृत्यू, स्थानिकांची मदतीसाठी धावाधाव

SCROLL FOR NEXT