जगासाठी धोक्याची घंटा! दक्षिण आफ्रिकेत आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट  Saam Tv
देश विदेश

जगासाठी धोक्याची घंटा! दक्षिण आफ्रिकेत आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट

केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : दक्षिण आफ्रिका (Africa), हाँगकाँग (Hong Kong) आणि बोत्सवानामध्ये (Botswana) कोविड-१९ चे नवीन व्हेरिएंट (Coronavirus) सापडल्यामुळे केंद्र सरकारकडून अलर्ट करण्यात येत आहे. गुरुवारी केंद्राने सर्व राज्य सरकारांना परदेशामधून विशेषतः या ३ देशामधून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) देखील या व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवून राहिले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये असे सांगितले आहे की, NCDC कडून अशी माहिती देण्यात आली आहे की, कोविड-१९ चा नवीन व्हेरिएंट B.१.१५२९ ची बोत्सवानामध्ये ३, दक्षिण आफ्रिकेमध्ये ६ आणि हाँगकाँगमध्ये १ अशी रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.

शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा नवा व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात म्युटेशन करू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, या ३ देशांशिवाय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जारी नियमावली मध्ये इतर काही देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने लक्ष देण्यास सांगितले आहे. MOHFW मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कांचा देखील बारकाईने लक्ष घातला पाहिजे आणि त्यांची चाचणी केली पाहिजे, असे या पत्रामध्ये सांगितले आहे.

जीनोमिक सिक्वेन्सिंगमध्ये आतापर्यंत १० प्रकरणांची पुष्टी झाली आहे. डॉ. टॉम पीकॉक, इम्पीरियल कॉलेज लंडन मधील विषाणूशास्त्रज्ञ, यांनी या आठवड्याच्या सुरुवातीलाच त्यांच्या ट्विटर अकाउंटवर नवीन व्हेरिएंट (b.१.१.५२९)ची माहिती देण्यात आली आहे. तेव्हापासून इथर शास्त्रज्ञ देखील या नव्या व्हेरिएंटचा शोध घेत आहेत.

प्रोफेसर एड्रियन पुरेन, NICD चे कार्यवाहक कार्यकारी संचालक यांनी दिलेल्या माहितीनुसार की, 'दक्षिण आफ्रिकेमध्ये एक नवीन पॅटर्न सापडला आहे. आमचे तज्ञ नवीन पॅटर्न समजून घेण्याकरिता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत. लवकरच या व्हेरिएंटविषयी माहिती मिळणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

SCROLL FOR NEXT