China Fire Accident  Saam TV
देश विदेश

China Fire : चीनमध्ये मोठी दुर्घटना! हेनान प्रांतातील कारखान्याला भीषण आग, ३६ जण होरपळले

चीनच्या हेनान प्रांतातील एका कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत तब्बल ३६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

Satish Daud

China Fire Accident : चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनच्या हेनान प्रांतातील एका कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत तब्बल ३६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, आगीची माहिती मिळताच, स्थानिकांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. 200 हून अधिक कर्मचारी आणि सुमारे 60 अग्निशमन दल याच्या मदतकार्यात गुंतले होते.

200 हून अधिक कर्मचारी आणि सुमारे 60 अग्निशमन दल याच्या मदतकार्यात गुंतले होते. आग इतकी भयंकर लागली होती, की ती आटोक्यात आणण्यासाठी कित्येक तास लागले. चिनी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आतापर्यंत ३६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, चीनमध्ये आग लागल्याच्या घटना काही नवीन नाही. सप्टेंबर महिन्यातही चीनमधील एका उंच इमारतीला भीषण आग लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील सरकारी मालकीची दूरसंचार कंपनीला ही आग लागली होती. चायना टेलिकॉमच्या इमारतीला लागलेल्या या आगीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. चांगशा ही हुनान प्रांताची राजधानी आहे, जिथे सुमारे 10 मिलियन लोक राहतात.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आज प्रचाराचा शेवटचा दिवस, मुख्यमंत्री दुचाकी चालवत करणार रोड शो

Haldi Kumkum gift ideas: यंदा संक्रांतीच्या हळदी-कुंकवासाठी काय वाण देणार? या आयडिया ठरतील बेस्ट ऑप्शन

Ladki Bahin Yojana: कोणत्याही क्षणी लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹३००० येणार? वाचा नवीन अपडेट

Cash For Votes : महापालिका निवडणुकीत मतांची किंमत 3 हजार, नेमकं कुठं कुठं पैसे वाटणाऱ्यांचा भंडाफोड

Success Story: आधी इंजिनियरिंग; १२ लाखांच्या पॅकेजची नोकरी सोडली अन् UPSC दिली; IPS सईम रजा यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT