Shiv Sena Political Crisis Saam tv
देश विदेश

Shiv Sena Political Crisis: शिवसेना भवन, शाखा, पक्ष निधी शिंदे गटाला द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

एका वकीलाने शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला द्या, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Shivaji Kale

Shiv Sena Crisis: निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

याचदरम्यान, एका वकीलाने शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला द्या, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २४ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. (Latest Marathi News)

शिवसेना पक्ष कोणाचा याबाबत निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच निर्णय दिला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या निर्णयाने उद्धव ठाकरे गटाला चांगलाच दणका बसल्याचे बोलले जात आहे.

यानंतर आता वकील आशिष गिरी यांनी शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वर्ग करण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

वकील आशिष गिरी यांच्या याचिकेतून थेट शिवसेनेच्या संपत्तीवर दावा केला आहे. शिवसेनेच्या मूळ पक्षाकडे मोठा पक्षनिधी आहे. तसेच पक्षाकडे प्रत्येक शहर-गावात कार्यालय आणि शाखा आहेत. शिवसेनेची संपत्तीकडे सुप्रीम कोर्ट कसं पाहतं, हे पाहावे लागणार आहे.

शिवसेनेचे मूळ अधिकार शिंदे गटाकडे गेल्यावर पक्षाची संपत्ती देखील त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचा पक्षनिधी शिंदे गटाकडे वर्ग करा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: 50 वर्षांनंतर बनणाऱ्या त्रिग्रही योगामुळे 'या' राशींचे येणार अच्छे दिन; तीन ग्रहांमुळे मिळणार

Mental Health : रील्स स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे मेंदूवर होणारे पाच घातक परिणाम

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात प्रथमच मांसविक्रीवर बंदी !

Karuna Munde : धनंजय मुंडेंचे मुंबईत ३ फ्लॅट, पण मुक्काम मात्र सरकारी बंगल्यावर, करूणा मुंडे अन् अंजली दमानियांचा गंभीर आरोप

ध्वाजारोहणास छगन भुजबळांचा नकार, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, महायुतीत नेमकं काय सुरू?

SCROLL FOR NEXT