West Bengal Saam TV
देश विदेश

West Bengal : आई बाबांना घरात ठेवले कोंडून; ५ व्या मजल्यावरून घेतली खाली उडी; प्रसिद्ध यूट्यूबरच्या कृत्याने नेटकरी चिंतेत

आत्महत्येचा प्रयत्न केलेली ही मुलगी एक यूट्यूबर असल्याचे समजले आहे.

साम टिव्ही ब्युरो

West Bengal : पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीने आपल्या आईवडीलांना घरात कोंडून घराच्या पाचव्या मजल्यावरून खाली उडी घेतली आहे. यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर आरजी कार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचा प्रयत्न केलेली ही मुलगी एक यूट्यूबर असल्याचे समजले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सोदपूर पीअरलेस नगर भागात मुलगी तिच्या आई वडीलांसह राहते. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याने मुलीने आई बाबांना बेडरुममध्ये बंद केले आणि ५ मजल्यावरील घरातून खाली उडी घेतली. सोमवारी ही धक्कादायक घटना घडली आहे. सुरूवातीला तिला प्रथम सागर दत्त वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पररिस्थिती चिंताजनक असल्याने तिला आरजी कार रुग्णालयात दाखल केले.

शेजारील व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरी असे या मुलीचे नाव असून तिचे वय १४ आहे तसेच ती इयत्ता ९वीमध्ये शिकत आहे. ती एक यूट्यूबर आहे. शेजारच्या व्यक्तींनी सांगितले की ती नेहमी सोशल मीडियावर रील व्हिडिओ बनवते. तसेत तिच्या यूट्यूब अकाउंटवर देखील ती पोस्ट व्हिडिओ पोस्ट करत असते. सोमवारी तिने आई (Mother) बाबांना खोलीत बंद केले. तिचे आणि तिच्या आई वडीलांचे रात्री भांडण झाले होते असे शेजारच्यांनी सांगितले आहे.

मुलीच्या घरातून तिच्या आई बाबांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आल्याने शेजारच्या एका महिलेने धावत जाऊन दरवाजा उघडला तेव्हा ते दोघेही घराच्या दिशेने धावत गेले. मात्र तोपर्यंत किशोरीने खाली उडी मारली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी देखील झालेल्या प्रकाराची नोंद केली असून मुलीने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणास्तव केली याची चौकशी पोलीस (Police) करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने खरेदीदारांच्या खिशाला कात्री, सलग चौथ्या दिवशी दरवाढ; आजचा ताजा भाव काय?

Maharashtra News Live Update: कृषी शिक्षणात महाराष्ट्र पडला मागे... राष्ट्रीय मानांकन यादीतून राहुरी कृषी विद्यापीठ ' आऊट '

Paper Leak: मोदींची 'फास्ट ट्रॅक कोर्ट'ची घोषणा, राहुल गांधींचा पलटवार; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह केल्या 'या' ३ मोठ्या मागण्या

ITR Filing 2026: 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर मोठा आर्थिक फटका; प्रत्येक करदात्याने ही बातमी एकदा वाचाच

Bollywood Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध अभिनेत्री चढली बोहल्यावर; नवऱ्यासाठी केली खास पोस्ट, पाहा लग्नाचे PHOTOS

SCROLL FOR NEXT