New Vande Bharat Train Features Saam Tv
देश विदेश

Vande Bharat train: ९ वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार, काय आहे मेगाप्लान?

Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत ट्रेनमुळे नागरिकांचा प्रवास वेगवान आणि आरामदायी झाला आहे. आता या ट्रेनची संख्या वाढत अनेक शहरं जोडली जात आहेत. लवकरच आपल्या सेवेमध्ये आणखी ९ वंदे भारत स्लीपर ट्रेन येणार आहेत.

Priya More

लांबपल्ल्याचा प्रवास आता आणखी वेगवान आणि आरमदायी होणार आहे. लवकरच ९ वंदे भारत स्लीपर ट्रेन आपल्या सेवेत येणार आहेत. यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने गुरूवारी एक निवेदन जारी केले. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात निश्चित क्रांती होईल. ही वंदे भारत ट्रेन भारताच्या वेगाने वाढणाऱ्या रेल्वे ताफ्यामध्ये एक अत्याधुनिक आणि महत्वाची भर असेल.

१५ जानेवारीला वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या पहिल्या संचाची मु्ंबई-अहमदाबाद मार्गावर ५४० किमी अंतर कापून संशोधन डिझाइन अँड स्टँडर्ड्स ऑर्गेनायझेशनकडून यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली. या वंदे भारत ट्रेनमध्ये १६ डबे आहेत. रेल्वे मंत्रालयाने पुढे सांगितले की, भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होण्यापूर्वी चाचण्यांच्या निकालांचे विश्लेषण केल्यानंतर आरडीएसओ अंतिम प्रमाणपत्र जारी करेल. रेल्वे सुरक्षा आयुक्त या ट्रेनची वेगाने चाचणी देखील करतील.

चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) डिसेंबर २०२४ मध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनचा पहिला संच सुरू करेल. या वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात, ट्रेनने कोटामध्ये ३०-४० किमीच्या छोट्या चाचण्या केल्या ज्यामध्ये या ट्रेनला १८० किमी प्रतितास वेगाने आरामदायी प्रवासाचा अनुभव आला.

वंदे भारत स्लीपर क्लासच्या नवीन आवृत्तीची सुरुवात ही रेल्वे आधुनिकीकरणातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जे प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान प्रवासाचे आश्वासन देते. सुविधा, वेग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून वंदे भारत स्लीपर ट्रेन्स येणाऱ्या काळात प्रवाश्यांसाठी सज्ज आहेत.', असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.

मंत्रालयाने पुढे असे देखील सांगितले की, 'प्रोटोटाइपची यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे. या वर्षी आणखी ९ वंदे भारत स्लीपर ट्रेन सेट तयार होण्याची अपेक्षा आहे. या वंदे भारत ट्रेन एप्रिल ते डिसेंबरदरम्यान आयसीएफद्वारे पोहोचवल्या जातील. या ट्रेनमध्ये तीन स्लीपर क्लास असतील. यामध्ये एसी फर्स्ट क्लास, एसी २-टायर आणि एसी ३-टायरचा समावेश आहे. या ट्रेनमध्ये एकूण १,१२८ प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात. त्यामुळे या प्रवाशांचा प्रवास फर्स्ट क्लास होणार आहे.

मागच्या महिन्यात मंत्रालयाने दोन भारतीय उत्पादकांकडून २४ डब्यांच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या ५० रॅकसाठी ऑर्डर दिली होती. पुढील दोन वर्षांत हे तयार होण्याची शक्यता आहे. २४ डब्यांच्या वंदे भारत स्लीपर ट्रेन सेटचे पूर्ण प्रमाणात उत्पादन २०२६-२७ मध्ये सुरू होईल. ज्यामुळे रेल्वे तंत्रज्ञानात भारताचे स्वावलंबन आणखी मजबूत होईल.' असे देखील मंत्रालयाने सांगितले. वंदे भारत स्लीपर ट्रेन्स ही वंदे भारत श्रेणीतील तिसरी श्रेणी आहे. मंत्रालयाने आधीच वंदे मेट्रो आणि वंदे भारत चेअर कार ट्रेन सुरू केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT