Corona Cases Update in Maharashtra| Covid Restriction Updates Saam TV
देश विदेश

Corona Cases Today: दिलासादायक! गेल्या 24 तासात 795 नवे कोरोनाबाधित नवे रुग्ण

देशात कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. देशात सुमारे २ वर्षांनंतर सलग दुसऱ्या दिवशी १ हजार पेक्षा कमी प्रमाणात कोरोना रुग्णांची नोंद झाली

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: देशात कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. देशात सुमारे २ वर्षांनंतर सलग दुसऱ्या दिवशी १ हजार पेक्षा कमी प्रमाणात कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, कोरोना (Corona) मृत्यूदराच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत ७९५ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये ८५ जणांचा मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा-

काल ९१३ नवीन रुग्ण (Patient) आणि १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ५ लाख २१ कोटी ४१६ जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय प्रकरणांची संख्या १२,०५४ वर येऊन पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरामध्ये देशात १ हजार २०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

यानंतर देशात सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ५४ झाली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख २१ हजार ४१६ झाली आहे. देशात आतापर्यंत ४ कोटी २४ लाख ९६ हजार ३६९ लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. आतापर्यंत १८४ कोटीपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे १८४ कोटीपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीचे १८४ कोटी ८७ लाख ३३ हजार ०८१ डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना २ कोटीपेक्षा जास्त कोरोना लस देण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

SCROLL FOR NEXT