Nepal-Tibet Earthquake Claims 32 Lives सोशल मीडिया
देश विदेश

Earthquake : तिबेटमध्ये भूकंपाने हाहाकार, ३२ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी, इमारती कोसळल्या, रस्ते खचले, VIDEO

Nepal-Tibet Earthquake Claims 32 Lives : नेपाळ-तिबेट सीमेवर ७.१ तीव्रतेचा भूकंप, ३२ जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या. हादरे भारतातही जाणवले. लोबुचे परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू. तिबेटमध्ये मोठे नुकसान.

Namdeo Kumbhar

Earthquake, Nepal-Tibet border : साखरझोपत असतानाच नेपाळ-तिबेट बॉर्डरजवळ भूकंपाचे तीव्र हादरले बसले. एका तासाच्या अंतरात एका मागून एक सहा भकूंप झाले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार (USGS), नेपाळ-तिबेट सीमेजवळ लोबुचेच्या 93 किलोमीटर ईशान्येला सकाळी 6:35 वाजता भूकंप झाला. त्याची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी होती. यामध्ये आतापर्यंत ३२ जणांनी जीव गमावल्याचे समोर आलेय.

अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारती कोसळल्याचे व्हिडीओत दिसत आहे. सकाळी ६.३५ वाजता ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद झाली. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, नेपाळपासून सुमारे 93 किमी ईशान्येस तिबेटमधील लोबुचे हे भूकंपाचा केंद्र असल्याचे समोर आले.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपामुळे तिबेटमध्ये मालमत्तेची मोठओी हानी झाली आहे, इमारती कोसळल्या आहेत. आतापर्यंत या भूकंपामध्ये ३२ जणांचा मृत्यू झालाय. अनेक इमारतींसह पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. या भूकंपाचे धक्के भारतमधील बिहार, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्येही जाणवले. त्याशिवाय नेपाळ, बांगलादेश आणि भूतानच्या अनेक भागातही भूकंपाचे हादरे जाणवले. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले आणि रस्त्यावर मोकळ्या जागेवर गेले. नागरिक झोपेत असताना अचानकच भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे भीतीचे वातावरण होते.

भूकंपाची तीव्रता प्रचंड मोठी होती. तिबेटसह नेपाळ, बांग्लादेश, भारत आणि चीनमध्येही याचे परिणाम जावले. 10 किलोमीटर खोलीवर केंद्रीत झालेल्या या भूकंपामुळे बिहार आणि उत्तर भारतातील अनेक भागत जबर हादरे बसले. लोबुचे हे नेपाळमधील खुंबू ग्लेशियरजवळ काठमांडूच्या पूर्वेस एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या जवळ आहे.

चीनच्या भूकंप मॉनिटरिंग एजन्सीने भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी नोंदवली आहे. या केंद्रबिंदू सुमारे 4,200 मीटर (13,800 फूट) उंचीवर असल्याचे चीनचे राज्य प्रसारक CCTV ने नोंदवले आहे. तर NCS डेटानुसार, एकूण तीन भूकंपाचे जबरी हादरे या प्रदेशात बसले. यामधील एकाची तीव्रता 4.7 इतकी नोंदवली आहे. तर दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 4.9 रेश्टर स्केल इतकी राहिली. एकामागोमाग एक जबरी हादरे बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतेच वातावरण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

SCROLL FOR NEXT