Kishori Pednekar ED Investigation Saam Tv
देश विदेश

Kishori Pednekar : मुंबईच्या माजी महापौरांची तब्बल 6 तास ईडी चौकशी; चौकशीत काय घडलं? स्वतः पेडणेकरांनी सांगितलं

Covid Body Bag Scam : मुंबईच्या माजी महापौरांची तब्बल 6 तास ईडी चौकशी; चौकशीत काय घडलं? स्वतः पेडणेकरांनी सांगितलं

साम टिव्ही ब्युरो

Kishori Pednekar ED Investigation :

कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची आज ईडी चौकशी झाली. त्यांची तब्बल सहा तास चौकशी झाली. पून्हा चौकशीला बोलवण्यात आलं नसल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.

चौकशीनंतर ईडी कार्यलयातून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत की, ''आज मला ईडीने चौकशीला बोलावलं. त्यानुसार मी चौकशीला हजर राहिली. त्याना ज्या प्रश्नांची उत्तर हवी होती, ती मी दिलेली आहे. कागदांची पूर्तताही केलेली आहे. अन्य काही कागदपत्र हवी असतील तर तीही मी वकिलांमार्फत देईल. माझावर गुन्हा नाही चौकशीसाठी बोलावलं होतं.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे प्रकरण?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोना काळात मुंबई महापालिकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला असून यामध्ये किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी केली होती. याप्रकरणी ईडी अधिकाऱ्यांनी बीएमसीच्या काही अधिकाऱ्यांच्या घरी छापेमारीही केली होती. (Latest Marathi News)

बॉडी बॅग खरेदीत घोटाळा

मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग २००० रुपयांऐवजी ६,८०० रुपयांना खरेदी केल्याचं ईडीने (ED) म्हटलं होतं. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला होता. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या.

दरम्यान, याच प्रकरणी ईडीने आज किशोरी पेडणेकर यांना आपल्या कार्यलयात चौकशीसाठी बोलावले होते. याआधीही पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र त्यावेळी त्या हजार राहिल्या नव्हत्या. मात्र आता दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर त्या चौकशीसाठी ईडी कार्यलयात पोहोचल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Tourism: २० हजारांपेक्षाही कमीत एवढी मस्त ट्रिप? दिवाळी सुट्टीसाठी भारतातील ६ स्वस्त आणि सुंदर ठिकाणं

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांची बीडच्या गेवराईतील उमापुरमध्ये सभा

Maharashtra Politics: एकामागोमाग एक, पक्ष नेत्यांचे राजीनामे;मतदारसंघातच आमदार रोहित पवारांविरोधात नाराजीचा सूर?

टोकाचं पाऊल उचललेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून दिवाळी सहाय्य|VIDEO

वंदे भारतला नव रुप मिळणार! स्लीपर कोचची वाट पाहणाऱ्यांचा आनंद द्विगणित होणार, ट्रेनचा आलिशान कोच कसा असणार? पाहा...

SCROLL FOR NEXT