Amrit Bharat Station Scheme Saam Tv
देश विदेश

Amrit Bharat Station Scheme: 'अमृत भारत स्टेशन' योजनेअंतर्गत देशातील 508 स्थानकांचा होणार कायापालट; महाराष्ट्रातील इतक्या स्टेशनचा समावेश

PM Modi Inaugurates Armit Bharat Station Scheme: अमृत ​​भारत स्टेशन योजनेअंतर्गत भारतभरातील तब्बल ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी त्यांनी पायाभरणी केली.

Priya More

Delhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज 'अमृत भारत स्टेशन' योजनेचे (Amrit Bharat Station Scheme) उद्घाटन केले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. अमृत ​​भारत स्टेशन योजनेअंतर्गत भारतभरातील तब्बल ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी त्यांनी पायाभरणी केली.

या कार्यक्रमात बोलताना पीएम मोदींनी सांगितले की, 'आजपासून एक नवा अध्याय सुरू होत आहे. देशातील १३०० रेल्वे स्थानकांपैकी ५०८ अमृत भारत स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. यावर २५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.'

'अमृत भारत स्टेशन योजने'अंतर्गत पंतप्रधानांनी देशातील वेगवेगळ्या प्रमुख रेल्वे स्थानकांच्या पुर्निकासाच्या कामांचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत अनेक रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. आतापर्यंत हा भारतीय रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाबाबतचा सर्वात मोठा निर्णय आहे. २७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ५०८ रेल्वे स्थानकांचा या योजनेअंतर्गत पुनर्विकास होणार आहे. या रेल्वे स्थानकांच्या विकासाठी जवळपास २४ हजार ४७० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

या कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदींनी सांगितले की,'याचा फायदा देशातील सर्व राज्यांना होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 4500 कोटी रुपये खर्चून ५५ अमृत स्टेशन विकसित केले जाणार आहेत. राजस्थानमधील ५५ रेल्वे स्थानकही अमृत रेल्वे स्टेशन म्हणून विकसित होणार आहेत. रेल्वेमध्ये जेवढी कामं केली जात आहेत त्यामुळे सर्वांना आनंद आणि आश्चर्य वाटत आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाचे आभार.'

'जगातील दक्षिण आफ्रिका, युक्रेन, पोलंड, यूके आणि स्वीडन यासारख्या देशांपेक्षा या 9 वर्षात आपल्या देशात जास्त रेल्वे रुळ टाकण्यात आले आहेत. दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये एकूण जेवढे रेल्वे ट्रॅक आहेत ते गेल्या काही वर्षांमध्ये भारतात तयार करण्यात आले. या माध्यमातून प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर बसण्यासाठी उत्तम वेटिंग रूम तयार करण्यात येणार आहेत. त्याचसोबत, हजारो स्थानकांवर मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आह.', असं ही त्यांनी सांगितलं.

असा केला जाणार रेल्वे स्थानकांना पुनर्विकास -

- रेल्वे स्थानकांचा सिटी सेंटर म्हणून विकास केला जाणार.

- शहरांमधील दोन्ही टोकांना जोडण्याचा प्रयत्न केला जाणार.

- रेल्वे स्थनकांमध्ये अधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार.

- अत्याधुनिक प्रवासी सुविधांना प्राधान्य दिले जाणार.

- उत्तम मालवाहू व्यवस्था आणि इंटरमॉडेल इंटीग्रेशन करण्यात येणार.

- एकसमान आणि सहाय्यक मार्गदर्शक चिन्हांचा समावेश.

- स्थानिक कला आणि संस्कृतीला प्राधान्य देण्यात येणार.

या राज्यातील इतक्या रेल्वे स्थानकांचा समावेश -

उत्तर प्रदेश - ५५ रेल्वे स्थानक

राजस्थान - ५५ रेल्वे स्थानक

बिहार- ४९ रेल्वे स्थानक

महाराष्ट्र - ४४ रेल्वे स्थानक

पश्चिम बंगाल - ३७ रेल्वे स्थानक

मध्य प्रदेश - ३४ रेल्वे स्थानक

आसाम - ३२ रेल्वे स्थानक

ओडिशा - २५ रेल्वे स्थानक

पंजाब - २२ रेल्वे स्थानक

गुजरात - २१ रेल्व स्थानक

तेलंगणा - २१ रेल्वे स्थानक

झारंखंड- २० रेल्वे स्थानक

आंध्र प्रदेश - १८ रेल्वे स्थानक

तामिळनाडू - १८ रेल्वे स्थानक

हरियाणा - १५ रेल्वे स्थानक

कर्नाटक - १३ रेल्वे स्थानक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT