Amit Shah On Ajit Pawar: 'अजितदादा योग्य जागेवर बसलात, पण यायला थोडा उशीर केलात'; अमित शहा यांचं मोठं विधान

Amit Shah Latest Speech: केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर मोठं वक्तव्य केलं.
Amit Shah On Ajit Pawar
Amit Shah On Ajit PawarSaam tv
Published On

Amit Shah News: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर मोठं वक्तव्य केलं. 'अजितदादा पहिल्यांदाच माझ्यासोबत बसलेले आहेत. त्यामुळे सर्वात आधी मी सांगू इच्छितो की, अजितदादा, आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात. पण, तुम्ही याठिकाणी बसण्यासाठी थोडा उशीरच केला, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलं. (Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, अमित शहा यांनी सहकार विभागाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्यासपीठावर उपस्थित होते. अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजित पवारांना शुभेच्छा दिल्या.

Amit Shah On Ajit Pawar
Eknath Shinde Speech: 'अमित शहांचे नेतृत्व सहकार क्षेत्रासाठी वरदान...' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव

अमित शहा म्हणाले, 'अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमात आहेत. माझ्यासोबत ते पहिल्यांदाच बसलेले आहेत. त्यामुळे सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजितदादा , आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात. हीच तुमची योग्य जागा आहे. याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केलात'.

अमित शहा पुढे म्हणाले, 'सहकार विभागाच्या माध्यमातून पोर्टल आपण आणत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारातून समृद्धीकडेच संकल्प घेतला आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षात ६० कोटींहून अधिक गरीब लोकांना सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मदत केली आहे'.

Amit Shah On Ajit Pawar
Amit Shah Pune Visit: गृहमंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्यात मोठा बदल! सर्व बैठका रद्द; तातडीने दिल्लीला रवाना होणार

'गरीबांच्या इच्छा गेल्या ७० वर्षात पूर्ण झाल्या नव्हत्या. पण पंतप्रधान मोदी यांनी ९ वर्षांच्या कालावधित सगळं काम करून टाकलं आहे. गरिबांसाठी घर, वीज, शौचालय, बँक खाते अशा सर्व गरजा मोदींनी पूर्ण केल्या आहेत, असे अमित शहा म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com