Vaishno Devi Temple news Saam
देश विदेश

Vaishno Devi Temple : अयोध्येनंतर वैष्णोदेवी मंदिरात महाघोटाळा, मंदिरात 500 कोटींची नकली चांदी?

Vaishno Devi Temple news : वैष्णोदेवी मंदिरातील सुमारे ५०० कोटी रुपयांच्या कथित बनावट चांदी प्रकरणात जम्मू न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना सर्व कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Namdeo Kumbhar

रोहित कदम, साम टीव्ही प्रतिनिधी

Vaishno Devi Temple Fake Silver Case: कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वैष्णो देवी मंदिरातून धक्कादायक माहिती समोर आलीये. मंदिरातील तब्बल 500 कोटींची चांदी नकली असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे भाविकांनी अर्पण केलेली चांदीच नकली आहे की त्यात फेरफार करण्यात आलाय?, असा सवाल उपस्थित होतोय. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरण ताजं असताना वैष्णो देवी मंदिरातही असाच धक्कादायक प्रकार समोर आलाय. वैष्णोदेवी मंदिरात अर्पण करण्यात आलेली चांदी नकली असल्याचं उघड झालंय. वैष्णो देवी मंदिरातील तब्बल 500 कोटींच्या 'बनावट चांदी' प्रकरणी न्यायालयानं कठोर भूमिका घेतलीये. न्यायालयानं या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांना 29 जुलैला सर्व कागदपत्रांसह हजर राहण्याचे निर्देश दिलेत. शेकडो कोटींचं नकली चांदीचं प्रकरण नेमकं काय आहे ते पाहूयात...

वैष्णो देवी मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या सुमारे 20 टन चांदीची तपासणी करण्यात आली. त्यापैकी केवळ 5 ते 6 टक्के चांदीच खरी असल्याचं आढळलं. उर्वरित चांदी कॅडमियम, लोह आणि इतर कमी दर्जाच्या धातूंपासून बनलेली असल्याचा आरोप करण्यात आलाय. या आरोपांमुळे अर्पण केलेल्या चांदीमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ, अदलाबदल आणि अपहार झाल्याचा संशय निर्माण झालाय.

तर दुसरीकडे, तक्रारदारानं या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी सखोल चौकशीची मागणी केलीये. यात

चांदीच्या वस्तू खरेदी करण्याची आणि साठवण्याची प्रक्रिया, संबंधित नोंदी आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, वाहतुकीची प्रक्रिया तसंच चांदी वितळवण्याची संपूर्ण प्रक्रिया या बाबींचा समावेश आहे....

विशेष म्हणजे, जम्मू न्यायालयातील सुनावणीनंतर आता या प्रकरणाच्या तपासाला नवीन वळण मिळालंय. इतकंच नव्हे तर बनावट चांदी प्रकरणातील महत्त्वपूर्ण पुरावे आणि त्यासंदर्भात कुठल्याही उपाययोजनांचा उल्लेख अहवालात नव्हता. त्यामुळे जम्मूच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी तपास अधिकाऱ्यांना संपूर्ण रेकॉर्डसह न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला. आधी राम मंदिर, नंतर बद्रिनाथ मंदिर आणि आता वैष्णोदेवी मंदिरातल्या अपहारामुळे देशभरातल्या भाविकांना धक्क्यांवर धक्के बसताय एवढं खरं....

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Burfi Recipe: घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट नारळाची बर्फी; वाचा सोपी रेसिपी

अकोला महापालिकेत मोठी घडामोड; ३ नगरसेवक अपात्र, नेमकं प्रकरण काय?

Raj Thackeray : सरकारला वांगचुक यांचा बळी घ्यायचा का? राज ठाकरेंचा केंद्र सरकारला संतप्त सवाल

Maharashtra News Live Update: केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांच्यातील साखरपुड्याचा व्हिडिओ अखेर समोर

Mumbai : तरुणाचे केस कापून अर्धनग्न अवस्थेत काढली धिंड; मुंबईतील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT