Passengers Poisoned By Egg Biryani:  Saamtv
देश विदेश

Food Poisoning: रेल्वेतील अंडा बिर्याणीमधून विषबाधा.. ४० हून अधिक प्रवासी रुग्णालयात; नेमकं काय घडलं?

Passengers Poisoned By Egg Biryani: यशवंतपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये हा प्रकार घडला. विषबाधा झालेल्या प्रवाशांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

नागपूर|ता. २९ एप्रिल २०२४

रेल्वे प्रवासादरम्यान खालेल्या अंडा बिर्याणीमुळे ४० पेक्षा अधिक प्रवाशांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यशवंतपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये हा प्रकार घडला. विषबाधा झालेल्या प्रवाशांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, यशवंतपूरहून गोरखपूरला जाणाऱ्या 22534 एक्स्प्रेसमधील प्रवाशांना अंडा बिर्याणी खाणे चांगलेच महागात पडल्याचे समोर आले आहे. या प्रवाशांनी लोकांनी ट्रेनमध्ये धावणाऱ्या विक्रेत्यांकडून बिर्याणी आणि अंडी करी विकत घेऊन खाल्ली होती. त्यानंतर त्यांना पोटदुखी, उलट्या, जुलाबाचा त्रास जाणवू लागला. वेगवेगळ्या डब्यात बसलेल्या प्रवाशांना एकाचवेळी त्रास जाणवू लागल्याने एकच खळबळ उडाली.

या घटनेचे गांभीर्य ओळखून कानपूर रेल्वे स्थानकावर डॉक्टरांचे पथक ट्रेनमध्ये चढले. ज्यानंतर सर्व प्रवाशांवर उपचार सुरू करण्यात आले. रेल्वे प्रशासन, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि डॉक्टरांच्या टीमच्या मदतीने आजारी प्रवाशांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले. सध्या या प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या धक्कादायक प्रकारानंतर ही बिर्याणीची पार्सल कुठून घेण्यात आली, याबाबत रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे. या चौकशीमध्ये नागपूर तसेच बल्लारशाह रेल्वे स्टेशनच्या जनआहार स्टॉलवरून ही बिर्याणीची पार्सल अनेक ठिकाणी ट्रेनमध्ये देण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून दोन्ही ठिकाणचे सँपल तपासणीसाठी नेण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT