50 IPS officers transferred in Uttar pradesh  Saam Tv News
देश विदेश

नव्या वर्षात पोलीस दलात मोठा फेरबदल; 50 IPS अधिकाऱ्यांना प्रमोशन, कुणाची कुठे नियुक्ती होणार?

Police Officer Promotion in Uttar pradesh : नव्या वर्षात पोलीस दलात मोठा फेरबदल झालाय. 50 IPS अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळालंय.

Vishal Gangurde

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पोलीस दलात मोठा फेरबदल

नव्या वर्षात 50 आयपीएस अधिकाऱ्यांना बढती

2013 बॅचचे 28, 2012 बॅचचे 13 अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळालंय

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर प्रदेशच्या पोलीस दलात मोठा फेरबदल झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये १ जानेवारी रोजी ५० आयपीएस अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समावेश आहे. त्यांना बढती मिळाल्याने त्यांची विविध जिल्ह्यात महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशमधील या आयपीएस अधिकाऱ्यांना बढती मिळाल्यानंतर त्यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांपर्यंत पदावर बदली होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बदली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यात २०१३ बॅचच्या २८ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त २००१ बॅचच्या तीन आयपीएस अधिकाऱ्यांनाही प्रमोशन मिळालं आहे. २००८ बॅचच्या सहा अधिकाऱ्यांची आयजी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. २०१२ बॅचच्या १३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या एसएसपी ते डिआयजी पदावर प्रमोशन मिळालं आहे. पुढील काही दिवसांत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची सूचना समोर येईल.

पोलीस महानिरीक्षक पदावरून अतिरिक्त पोलीस महासंचालकपदावर तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण कुमार हे सध्या अयोध्या भागात पोलीस महानिरीक्षक आहेत. तरुण बाबा लखनऊमध्ये पोलीस महानिरीक्षक पदावर आहेत. आशुतोष कुमार हे सह पोलीस आयुक्त आहेत. या तिन्ही अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. २००८ बॅचच्या सहा आयपीएस अधिकाऱ्यांनाही बढती मिळाली आहे. यात किरण एस, आनंद कुलकर्णी, एन कुलांची, अमित वर्मा, राजीव मल्होत्रा आणि अखिलेश निगम यांच्या नावाचा समावेश आहे.

यूपीमध्ये किती आयपीएस अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे?

उत्तर प्रदेशमध्ये एकूण 50 आयपीएस अधिकाऱ्यांना बढती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT