Nepal Flood Saam Tv
देश विदेश

Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! पूर- भूस्खलनामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू तर 28 बेपत्ता, पाहा VIDEO

Nepal Heavy Rainfall: नेपाळमधील संखुवासभा जिल्ह्यातील नागरिकांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

Priya More

Nepal News: नेपाळमध्ये मान्सूनमुळे (Monsoon 2023) सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे (Nepal Heavy Rain) नेपाळमधील अनेक भागांमध्ये पूर आला आहे. तर काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. पूर (Nepal Flood) आणि भूस्खलनामुळे नेपाळमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 जण बेपत्ता झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संखुवासभा जिल्ह्यातील नागरिकांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या जिल्ह्यात किमान 16 जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. जिल्हा पोलीस कार्यालयाचे प्रमुख बिरेंद्र गोदार यांनी सांगितले की, शनिवार सायंकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे हेवाखोला येथे मोठे नुकसान झाले आहे. याठिकाणी आलेल्या पुरानंतर सुपर हेवाखोला हायड्रोइलेक्ट्रिकचे 16 कामगार बेपत्ता झाले आहेत. या पुरात सात घरे वाहून गेली आहेत.

मान्सूनमुळे पूर्व नेपाळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोशी प्रांतातील तपलेजुंग, पंचथर, संखुवासभा आणि तेरहथुम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पाचेही नुकसान झाले आहे.

चैनपूर नगरपालिका-4 मधील बांधकामाधीन सुपर हेवा जलविद्युत प्रकल्प परिसरात काम करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर 21 जण बेपत्ता झाले आहेत.पुरानंतर मजूर सुरक्षित ठिकाणी गेले की हेवा नदीत वाहून गेले? याची आम्ही चौकशी करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तर, पाचथर जिल्ह्यात भूस्खलनात घर वाहून गेल्याने नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. या परिसरात पुरानंतर चैनपूरचे पाच गावकरीही बेपत्ता झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या मुसळधार पावसादरम्यान नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: शॉवरनंतर केसांची अशी घ्या काळजी; ओले केस गळणे आणि तुटणे होईल कमी

Maharashtra News Live Update: हिंगोलीत पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Blood Sugar Control Milk: ब्लड शुगर कंट्रोलसाठी 4 प्रकारचे दूध आहेत सर्वात बेस्ट; डायबिटीजच्या रुग्णांनी कोणते दूध प्यावे?

Maharashtra Police: पोलिस अधिकाऱ्याने खाकी वर्दीत आयुष्य संपवलं, धावत्या ट्रेनसमोर उडी मारली; पोलिस दलात खळबळ

Online Shopping Charges : ऑनलाइन वस्तू मागवण्याआधी हे वाचा! सप्टेंबरपासून डिलिव्हरी चार्ज वाढणार

SCROLL FOR NEXT