New Traffic Rules Saam TV
देश विदेश

Traffic Rules: खिशाला २० हजारांचा फटका बसू द्यायचा नसेल तर, वाहतुकीचे हे 'पाच' नवीन नियम माहीत असायलाच हवेत

News Traffic Rules : खिशाला फटका आणि तुरुंगवारी टाळायची असेल तर हे पाच ट्रॅफिक नियम जाणून घ्या.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे
Rs 2000 fine would be imposed on the riders not wearing helmets properly.

नीट हेल्मेट न परिधान करणार्‍यांना 2000 रुपये दंड

भारतीय रस्त्यांवरील अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारने 1998 चा मोटार वाहन कायदा कठोर केला आहे. यासोबत दुचाकीस्वारांना हेल्मेट न घालणे किंवा ते नीट परिधान न करणे, यासाठी तात्काळ 2 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच सरकारने हेल्मेट परिधान करण्याविषयीचे नियम कडक केले आहेत.

Rs 1000 fine if the children below 4 years are not wearing helmets and harness belts and if the driver exceeds the speed limit of 40km/hr.

4 वर्षांपेक्षा जास्त मुलांनी हेल्मेट आणि हार्नेस बेल्ट न लावल्यास पालकांना 1000 रुपये दंड

चार वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना आता दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट घालणे आता बंधनकारक असणार आहे, असं केंद्र सरकारने सांगितले आहे. केंद्रीय मोटार वाहन दुरुस्ती विधेयक 2019 च्या कलम 129 मध्ये यासंदर्भात तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. जर कोणी हा नियम मोडला तर त्याला किमान 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. किंवा ड्रायव्हिंग लायसन्सही तीन महिन्यांसाठी जप्त केले जाऊ शकते.

Fine of Rs 20000 would be imposed in case you're overloading a two-wheeler.

दुचाकी ओव्हरलोड केल्यास 20000 रुपये दंड

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, वाहन ओव्हरलोड केल्यास तुम्हाला 20,000 रुपयांचा मोठा दंड भरावा लागू शकतो. याशिवाय, असे केल्यास 2000 रुपये प्रति टन अतिरिक्त दंडही भरावा लागणार आहे. याआधीही अनेक हजारांची चलन कापल्याची प्रकरणे समोर आली आहेत. दुचाकी हे नॉन कमर्शियल वाहन असल्याने त्यावरुन मालवाहतुक करण्यास बंदी आहे.

All Indian states will be issuing a uniform format for International Driving Permit (IDP) in the form of a booklet.

सर्व आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स एकाच फॉरमॅटमध्ये

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हर परमिट (आयडीपी) आपल्याला दुसऱ्या देशामध्ये वाहन चालविण्यास परवानगी देते, जोपर्यंत आपल्याकडे आपल्या राज्याद्वारे जारी वैध ड्रायव्हर्स परवाना आहे. हे लायसन्स 175 पेक्षा अधिक देशांमध्ये ओळख पटवण्यायोग्य फॉर्म म्हणून ओळखले जाते. सरकारने देशात जारी केलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिटसाठी (IDP) एकसमान स्वरूप सादर केले आहे, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) एका निवेदनात म्हटले आहे.

QR Code will be included in the booklet to link the IDP with the driving license and the data related to the driver.

OR Code मध्ये असणार सर्व माहिती

हे ड्रायव्हिंग लायसन्स आता पुस्तिकेच्या स्वरुपात जारी केले जाईल आणि त्यामध्ये ड्रायव्हरशी संबंधित सर्व माहितीसाठी एक QR कोड देखील असेल. यात अधिकारी हा कोड स्कॅन करुन परवानाधारकाची ओळख आणि इतर माहितीचे पुनरावलोकन करू शकतील, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT