Durga Puja Stampede in Kolkata 
देश विदेश

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

देशभरात सणांच्या उत्साहात २४ तासांत झालेल्या पाच भीषण दुर्घटनांमध्ये ४९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ग्वाल्हेरमधील ट्रक अपघात, कोलकात्यातील दुर्गापूजा मंडपातील चेंगराचेंगरी, कोटा बस दुर्घटनेचा सविस्तर आढावा वाचा.

Namdeo Kumbhar

देशभरात सध्या नवरात्रोत्सवाचा आणि सणांचा उत्साह सुरू आहे. पण या आनंदाच्या काळात मागील २४ तासांत वेगवेगळ्या राज्यांमध्ये घडलेल्या ५ अत्यंत भीषण दुर्घटनांमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. २४ तासात तब्बल ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोलकाता येथील दुर्गापूजा पंडालमधील चेंगराचेंगरी असो, ग्वालियर आणि कोटा येथील रस्ते अपघात असोत किंवा उत्तर प्रदेशातील दुर्घटना, या लोगोपाठच्या दुर्घटनांनी सणांच्या आनंदावर विरजण घातले. या वेगवेगळ्या घटनांमध्ये ४९ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

ग्वाल्हेरमध्ये ट्रकने उडवले; १८ जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे शीतला माता मंदिराजवळ शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास भीषण अपघात घडला. नवरात्रोत्सवामुळे या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. छिनोरहून येणाऱ्या मार्गावर एका अनियंत्रित ट्रकने पायी चालणाऱ्या आणि उभ्या असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिली. यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या दुर्घटनेत घटनास्थळावर सुरक्षेसाठी तैनात असलेले दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

एसएसपींनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत ३९ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी १८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, ५ ते ६ जणांना गंभीर फ्रॅक्चर झाले आहेत. इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे.

कोलकाता दुर्गापूजा पंडाल चेंगराचेंगरी: १९ जणांचा मृत्यू

शनिवारी संध्याकाळी कोलकाता येथील चोरबागान परिसरातील सार्वजनीक दुर्गा पूजा मंडपात अचानक चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. मृतांमध्ये ४ पुरुष, २ लहान मुले आणि १३ महिलांचा समावेश आहे. जखमींपैकी ११ जणांना उपचारासाठी थेट एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेनंतर पश्चिम बंगाल सरकारने गंभीर दखल घेत, शहरातील प्रमुख आणि लोकप्रिय दुर्गा पूजा पंडालच्या सुरक्षा व्यवस्थेची चौकशी करण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे.

उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये कारने मजुरांना चिरडले; ३ मृत्यू

उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे शनिवारी रात्री ११ वाजता एक भीषण अपघात घडला. चरंगाहिया बेलहा गावातील दुर्गा मंदिरासमोर पडदा लावून व्हिडिओ पाहत बसलेल्या ग्रामस्थांवर एका भरधाव कारने अचानक धडक दिली. या अपघातात ७ जण जखमी झाले, त्यापैकी ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत पतेश्वरी प्रसाद उर्फ महाता प्रसाद, मनोज सिंग आणि गणेश पांडे अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बहराइच येथे हलविण्यात आले आहे.

बस दरीत कोसळली; ८ प्रवाशांचा मृत्यू

शनिवारी पहाटे राजस्थानमधील कोटा येथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर एक मोठा रस्ते अपघात झाला. दिल्लीहून मुंबईच्या दिशेने जाणारी एक प्रवासी बस कोटा जिल्ह्यातील कराडियाजवळ सुमारे १५ फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी अंधार असल्यामुळे बचावकार्यात काही काळ अडथळे निर्माण झाले होते. अखेर बसची खिडकी तोडून सर्व जखमींना अत्यंत शर्थीने बाहेर काढण्यात आले.

हैदराबादमधील दांडिया कार्यक्रमादरम्यान कमान कोसळली; विद्यार्थिनीचा मृत्यू

हैदराबादमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात (इंजिनिअरिंग कॉलेज) डांडिया उत्सवाचा कार्यक्रम सुरू असताना अचानक लोखंडी कमान (तोरण) कोसळली. या दुर्घटनेत एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी जागीच मृत पावली तर १४ अन्य विद्यार्थी जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सजावटीची जड कमान खाली कोसळली, ज्याच्या खाली ती विद्यार्थिनी दबली गेली. तिला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

SCROLL FOR NEXT