South Africa Bus Accident  ANI
देश विदेश

South Africa Bus Accident : भाविकांच्या बसला भीषण अपघात; बस दरीत कोसळून ४५ जणांचा मृत्यू

South Africa Bus Accident update : दक्षिण आफ्रिकेतून रस्ते अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये बसच्या भीषण अपघातात ४५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

South Africa Bus Accident News :

दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) रस्ते अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये बसच्या भीषण अपघातात ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी बोत्सवाना येथून मोरिया येथे जाणाऱ्या भाविकांची बस दरीत कोसळून ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. (Latest Marathi News)

दक्षिण आफ्रिकेमध्ये गुरुवारी ईस्टर साजरा करण्यासाठी घेऊन जाणारी बस एका डोंगरावरील पुलावरून दरीत कोसळली. बस दरीत कोसळल्यानंतर पेट घेतला. या दुर्घटनेत ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. बोत्सवाना या देशातून मोरिया शहरात ही बस जात होती. या घटनेत ८ वर्षांचा एका बाळाचा जीव वाचला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या बाळाला गंभीर दुखापत झाली आहे.

लिम्पोपोमधील सरकारने सांगितलं की, बस १६४ फूट दरीत कोसळून तिला आग (Fire) लागली. या घटनेत अनेक जणांच्या मृतदेह जळाले आहेत. यामुळे या मृतदेहांची ओळखही पटवणे अवघड झालं आहे. तर काही जणांचे मृतदेह हे बसमध्येच असल्याचे सांगण्यात येत आहे.

मोरिया शहरातील प्रसिद्ध ईस्टर तीर्थक्षेत्राच्या दिशेने हे भाविक निघाले होते. चालकाकडून बसवरील नियंत्रण गमावल्याने हा भीषण अपघात (Accident) झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्या वर्षी झालेल्या अपघातात २०० हूण अधिक जणांचा मृत्यू

लिम्पोपोमध्ये परिवहन मंत्री सिंडिसिवे चिंकुगा यांनी अपघातानंतर घटनास्थळी भेट घेतली. तसेच त्यांनी अपघातात मृत पावलेल्या लोकांप्रती संवेदना व्यक्त केली. तसेच त्यांनी अपघाताचं नेमकं कारण काय, याचाही शोध घेत असल्याची माहिती दिली. गेल्या वर्षी ईस्टर आठवड्यात रस्ते अपघातात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

राष्ट्राध्यक्ष रामफोसा यांनी लोकांना केलं मोठं आवाहन

'ईस्टर सुरक्षितपणे साजरा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असं आवाहन ईस्टरचा संदेश देताना राष्ट्राध्यक्ष सिरील रामफोसा यांनी नागरिकांना केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Insurance: आता २४ तास अ‍ॅडमिड होण्याची गरज नाही; केवळ २ तास रूग्णालयात राहूनही मिळणार क्लेम

Maharashtra Politics : तुमचा मालक बाटगा, गळ्यात काँग्रेसचं मंगळसूत्र अन् टिळा शरद पवारांचा; रामदास कदमांचा ठाकरेंवर तिखट वार

Pune : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडलं झुरळ, कॅम्प परिसरातील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर

Maharashtra Live News Update : सामच्या बातमीनंतर धडगाव नगरपंचायत प्रशासनाला आली जाग

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT