ऑस्ट्रेलियातील एका समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेल्या ४ भारतीयांचा समुद्रात बुडून मृ्त्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. यातील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. व्हिक्टोरिया येथील दक्षिण-पश्चिम जंगलातील लेण्यांजवळील फिलिप आयलंड बीचवर ही घटना घडली असून कॅनबेरा येथील भारतीय उच्चायुक्तांनी याबाबतची माहिती सोशल मिडीया एक्स वर शेअर केली आहे.
दरम्यान मेलबर्नमधील भारतीय दूतावासाची टीम सर्व प्रकारच्या मदतीसाठी मृतांच्या मित्रांच्या संपर्कात असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. निवेदनात व्हिक्टोरिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 3.30 वाजता आपत्कालीन सेवांना एका पुरुषांसह तीन महिला पाण्यात बुडत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना समुद्रातून बाहेर काढले. पोलिसांनी त्यांना प्रथम सीपीआर दिला मात्र त्यातील तीन जणांचा मृत्यू झाला होता. मृतांपैकी तीन महिलांचे वय 20 तर पुरुषाचे वय 40 आहे. मृतांमधील एक महिला पंजाबमधील फगवाडा येथील आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उत्तरप्रदेशमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये ट्रक आणि टेम्पोमध्ये गुरूवारी पहाटे भयानक अपघात झाला. या अपघातात १२ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रस्त्यावर पडलेले मृतदेह, नातेवाईकांच्या किंचाळ्यांनी अवघा परिसर सुन्न झाल्याचे पाहायला मिळाले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये गुरूवारी पहाटे ट्रक आणि टेंम्पोमध्ये मोठा अपघात झाला. समोर आलेल्या माहितीनुसार शाहंजहापूर भागातील दमगडा गावचे काही लोक गंगेत स्नान करण्यासाठी ऑटोने फरुखाबाद येथील पांचाळ घाटाकडे रिक्षामधून जात होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.