Galwan Valley: गलवान चकमकीत 38 चीनी सैनिक ठार; चीनचा पोलखोल  Saam Tv
देश विदेश

Galwan Valley: गलवान चकमकीत 38 चीनी सैनिक ठार; चीनचा पोलखोल

जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन याच्या झालेल्या झटापटीमध्ये चिनचे ३८ सैनिक ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यामध्ये (Galwan Valley) भारत आणि चीन याच्या झालेल्या झटापटीमध्ये चिनचे ३८ सैनिक (Soldier) ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही झटापट झाल्यावर चीनने (China) केवळ ४ सैनिक ठार झाल्याचे होते. परंतु, ऑस्ट्रेलियातील (Australia) 'द क्लैक्सन' या वृत्तपत्राने दिलेल्या लेखात चिनचे ४ नाही तर तब्ब्ल ३८ सैनिक या झटापटीवेळेस गलवान नदीमध्ये (Galwan river) वाहून गेल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

यामुळे मृतांचा आकडा लपवणाऱ्या चिनचा बुरखा फाटला आहे. 'द क्लैक्सन' या वृत्तपत्राने दिलेल्या लेखात सांगितले आहे की, "चीनच्या पीपल्य लिबरेशन आर्मीची (People's Liberation Army) भारतीय (Indian) सैनिकांबरोबर झालेल्या झटापटीमध्ये चीनने जो मृतांचा अकडा सांगितला आहे, त्यापेक्षा ९ पटीने जास्त सैनिक ठार झाले आहेत. ही घटना घडली त्यावेळेस चिनचे ३८ सैनिक अंधारामधून वेगाने वाहत असलेली नदी (river) पार करत होते.

हे देखील पहा-

त्यावेळेस हे सर्व सैनिक या नदीत वाहून गेले होते. तब्बल १ वर्षाच्या तपासानंतर सोशल मीडिया (Social media) संशोधकांच्या एका समूहाने याविषयी अहवाल तयार केला आहे. 'द क्लैक्सन' वृत्तपत्राने आपल्या लेखात हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या वृत्तपत्राचे सांगणे आहे की, चीनने जाहीर केलेल्या मृत पावलेल्या ४ सैनिकांपैकी फक्त १ ज्युनियर सार्जंट वांग झुओरन बुडाल्याची नोंद आहे.

अहवालात दिलेल्या माहितीनुसार की, त्या रात्री वांगबरोबर चिनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेले होते. या अहवालामध्ये चिनी ब्लॉगर्सबरोबर चर्चा, काही चिनी नागरिकांकडून मिळालेली माहिती आणि चिनी सैनिकांच्या मोठ्या जीवितहानी विषयी मीडिया रिपोर्ट्सचा १ वर्षभर चाललेला तपास यांचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या सैनिकात झटापट झाली होती. १५ आणि १६ जून २०२० च्या रात्री ही घटना घडली होती.

सीमेवर या झटापटीमध्ये भारताच्या २० सैनिकांना वीरमरण आले होते. तर या झटापतीत चीनने आपले फक्त ४ सैनिक ठार झाल्याचे सांगितले होते. मृतांची खरी संख्या लपवण्याचा प्रयत्न चिनने यावेळी केला होता. परंतु, आता ऑस्ट्रेलियाच्या या वृत्तामुळे त्यांचा खरा चेहरा बाहेर आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: सहा राशींवर शनि महाराज कृपा; संकटं होतील दूर; आर्थिक लाभाचे योग, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

SCROLL FOR NEXT