Corona Cases Today: दिलासादायक! देशात गेल्या 24 तासांत 3116 नवे कोरोना रुग्ण, 47 मृत्यू Saam TV
देश विदेश

Corona Cases Today: दिलासादायक! देशात गेल्या 24 तासांत 3116 नवे कोरोना रुग्ण, 47 मृत्यू

देशात कोरोना (Corona ) रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसत आहे.

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: देशात कोरोना (Corona ) रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासामध्ये देशात कोरोना (Corona ) विषाणूचे ३ हजार ११६ नवीन रुग्ण (Patient) आढळले असून ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात केल्याने शनिवारी ५ हजार ५५९ जणांना रुग्णालयातून (hospital) डिस्चार्ज देण्यात आला आहे. (3116 new corona patients 47 deaths in the last 24 hours in the country)

हे देखील पहा-

सक्रिय प्रकरणांची संख्या ३८ हजार ६९ इतकी कमी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरामध्ये देशात ५ हजार ५५९ लोक बरे झाले होते. यामुळे देशामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३८ हजार ६९ इतकी झाली आहे. याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख १५ हजार ८५० इतकी झाली आहे.

मिळालेल्या आकडेवारीच्या माहितीनुसार, आतापर्यंत ४ कोटी २४ लाख ३७ हजार ७२ लोक संसर्गमुक्त झाले आहेत. आतापर्यंत १८० कोटींहून अधिक डोस (Dose) देण्यात आले आहेत. देशात लसीकरण (Vaccination) मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे १८० कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरामध्ये २० लाख ३१ हजार २७५ डोस देण्यात आले आहेत.

यानंतर आतापर्यंत लसीचे १८० कोटी १३ लाख २३ हजार ५४७ डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना २ कोटींपेक्षा जास्त कोरोना लस देण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT