सांगली : 'बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत!' अशी चारोळी बोलून दाखवली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी सांगलीच्या (Sangli) इस्लामपूर येथे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळयाचे अनावरण करताना बोलत होते. महाविकास आघाडीच्या सरकार (Government) सत्ता स्थापनेची आठवण सांगताना ग्रामविकास आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यानी ही चारोळी करून दाखवली आहे.
हे देखील पहा-
या कार्यक्रमात यावरून हशा पिकला होता. इस्लामपूर (Islampur) मधील पंचायत समितीतील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळयाचे अनावरण हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी सभेत बोलताना मुश्रीफ यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकानंतर (election) आम्ही सत्तेत येणार नाही असे वाटत असताना आम्ही सत्तेत कसे आलो याचा किस्सा सांगताना ही चारोळी ठोकली आहे. यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम , महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होते.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.