Air India Plane Crash Ahmedabad  Saam
देश विदेश

Ahmedabad Plane crash: चमत्कार! आगीत विमानाचे लोखंडी पार्टही वितळले, पण भगवद्गीता सहीसलामत

Air India Plane Crash Ahmedabad : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Bhagyashree Kamble

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १० क्रू मेंबर्स, २ पायलट यांच्यासह गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश होता. हे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच मेघाणीनगर परिसरात कोसळले आणि भीषण स्फोट झाला. इतका भयानक होता की, विमानाचे लोखंडदेखील वितळले, आणि प्रवाशांचे अवयव छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले. पण या सगळ्यात चमत्कारी गोष्ट समोर आली आहे. शोधकार्यादरम्यान, बचाव पथकाला पवित्र ग्रंथ भगवद्गीता सापडली आहे. विशेष म्हणजे, भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित असून, वाचनीय स्थितीत होती.

बचावपथकाला शोधकार्यदरम्यान भगवद्गीता सापडली. कदाचित कुणीतरी प्रवासी अहमदाबादहून लंडनला हा पवित्र ग्रंथ घेऊन जात असेल असा अंदाज लावण्यात येत आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक व्यक्ती अपघातस्थळी असलेल्या ढिगाऱ्यांमधून भगवद्गीता काढत आहे. तसेच गीतेची पाने दाखवताना दिसत आहे. अपघातस्थळी सगळं काही जळून राख झालं आहे. पण भगवद्गीतेला काहीच झालेलं दिसत नाही आहे.

सध्या याचा व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी चमत्कार असे कमेंट करून आश्चर्य व्यक्त केला आहे. दरम्यान, अपघातानंतर लंडनमधील एका हिंदू मंदिरात सुमारे १०० लोक जमले होते. त्यांनी मृतांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि शोकाकुल कुटुंबासाठी प्रार्थना केली आहे.

अपघात कसा घडला?

एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान अहमदाबादहून उड्डाण घेत असताना हा भीषण अपघात घडला. काही सेकंदात विमान वैद्यकीस महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या भींतीला धडकले. विमानात एकूण २४२ प्रवासी होते. त्यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात रमेश विश्वकुमार हा फक्त प्रवासी वाचला. तो आपत्कालीन दरवाज्याजवळील सीटवर बसला होता. अपघात घडल्यानंतर त्याने उडी मारली. या अपघातानंतर त्याचे प्राण वाचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gateway Of India: गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आणि खास 10 मनोरंजक तथ्ये

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Pune Crime: दुचाकीवरून ताम्हिणी घाटात गेले, दारू पिण्यावरून वाद; तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या

Karisma Kapoor: ३० हजार कोटींसाठी वाद! करिश्मा कपूरला एक्स पतीच्या मालमत्तेतचा किती हिस्सा मिळणार?

Green Bangles Design: श्रावणात महिलांनी हातात घाला हिरव्या बांगड्या, सौंदर्य येईल खुलून

SCROLL FOR NEXT