China Accident News
China Accident News Saam tv
देश विदेश

चीनमध्ये भीषण अपघात, एक्सप्रेस वेवर बस उलटूनल्यन २७ जणांचा मृत्यू

साम वृत्तसंथा

बीजिंग: दक्षिण-पश्चिम चीनमधील (China) एक्स्प्रेस वेवर रविवारी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाले आहेत. गुईझौ प्रांताची राजधानी असलेल्या गुईयांग शहराच्या आग्नेयेला असलेल्या सांडू काउंटीमध्ये सकाळी हा अपघात झाला. बसमध्ये एकुण ४७ जण प्रवास करत होते. जखमींवर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, ग्रामीण गुइझोउ प्रांतातील महामार्गावर एकूण ४७ जणांना घेऊन जाणारे वाहन पलटी झाल्याने हा अपघात झाला. उर्वरित २० जणांवर उपचार सुरू असून मदत आणि बचाव कर्मचारी घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ग्रामीण गुइझोउ प्रांत हा एक गरीब, दुर्गम आणि डोंगराळ प्रदेश आहे, तसेच अनेक वांशिक अल्पसंख्याकांचे निवासस्थान आहे. जूनमध्ये, गुइझोउ प्रांतात वेगवान ट्रेन रुळावरून घसरून चालकाचा मृत्यू झाला होता. मार्चमध्ये चीनच्या विमान अपघातात विमानातील सर्व प्रवासी ठार झाले होते. या जेटमध्ये १३२ जण होते.

गेल्या काही दिवसापूर्वी चीनमधील चांगशा शहरात ४२ मजली इमारतीला आग लागली. या आगीने भीषण रूप धारण केले होते. नंतर या घटनेचा व्हिडिओही समोर आला, ज्यामध्ये खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर आगीने भीषण रूप धारण केल्याचे स्पष्ट दिसत होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकाने बचावकार्य हाती घेतले. या इमारतीमध्ये चीनची दूरसंचार कंपनी चायना टेलिकॉमचे कार्यालय असल्याचे सांगण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : ठाकरेंच्या खासदाराने १० वर्ष टीकेशिवाय दुसरं काही केलं नाही, नारायण राणेंची टीका

CM Shinde: पीएम मोदींप्रमाणे मी ही सुट्टी न घेता काम करतोय: मुख्यमंत्री शिंदे

WhatsApp New Feature: वॉट्सअ‍ॅपच्या स्टोअरेजची चिंता मिटली; वाचा नवं Chat Filterer नेमकं आहे तरी काय?

Hair Care Tips: सिल्की स्मूथ केसांसाठी घरच्याघरी करा केराटिन ट्रिटमेंट

Girish Mahajan News : त्यानंतरच खडसेंनी भाजपचा प्रचार करावा; मंत्री गिरीश महाजन

SCROLL FOR NEXT