Funny Video : नवरीला सोडून करवलीच पकडली; भर मंडपात नवरदेवाने काय केलं? पाहा...

नवरदेवाचं कृत्य बघून नवरीला धक्काच बसला!
wedding funny viral video
wedding funny viral video Saam Tv

Viral Video: लग्न म्हटलं की गडबड गोंधळ आलाच. भारतात लगीनसराईचा (Marriage) हंगाम सुरू होताच, अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल (Funny Video) होतो. तर कधी नवरीने भरमंडपात केलेल्या डान्सचा. लग्नात कधी काय होईल याचा अंदाज लावणं जरा कठीणच असतं. असाच काहीसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Funny Viral Video)

व्हायरल झालेला (Viral Video) व्हिडीओ एका लग्नातील आहे. लग्नमंडपात नवरदेव नवरी उभे असून त्यांच्या हातात वरमाला दिसत आहे. नवरीसोबत तिच्या करवली आणि इतर मंडळीदेखील स्टेजवर उपस्थित आहेत. लग्न लागल्यानंतर नवरीबाई नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकते.

wedding funny viral video
King Cobra : अरे बाप रे बाप! स्कूटीमधून निघाला भलामोठा साप; Video पाहून थरकाप उडेल

दुसरीकडे नवरदेव नवरीच्या गळ्यात वरमाला टाकण्याऐवजी तिच्यासोबत उभ्या असलेल्या करवलीच्या गळ्यात वरमाला टाकतो. नवरदेवाने करवलीच्या गळ्यात वरमाला टाकताच, नवरीसह स्टेजवर उपस्थित असलेल्या इतर वऱ्हाडीमंडळीचा जबर धक्का बसल्याचं दिसत आहे. (Husband Wife Viral Video)

करवलीच्या गळ्यात वरमाला टाकल्यानंतर हा पठ्ठ्या इथंच थांबत नाही. तर उलट नाचून नवरीला चिडवायला लागतो. ही धम्माल बघून नवरी, तिची करवली व तिच्या कुटुंबाचे हावभाव बघण्यासारखे आहेत. तुम्हाला अंदाज आलाच असेल की हा व्हिडीओ ठरवून केलेला प्रॅन्क आहे.

व्हायरल झालेला हा मजेशीर व्हिडीओ its.chiku_या इंस्टाग्राम अकाउंटवरून अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. 'नवरीपेक्षा करवलीच भारी' अशी प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com