ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाला सुंदर, लांब आणि घणदाट केस आवडतात.
मात्र मोठ्या केसांची काळजी व्यवस्थित नाही घेतली तर ते कोरडे आणि निरजीव दिसू लागतात.
पार्लरमध्ये सतत वापरल्या जाणाऱ्या रसायनयुक्त क्रिम्समुळे केसं खराब होण्याची शक्यता असते.
घरच्याघरी केराटिन ट्रिटमेंट करण्यासाठी कोणत्याही माईल्ड शैंपूने केस स्वच्छ धवा आणि टॉवेलने ड्राय करुन घ्या
एका बाऊलमध्ये कोरफड जेल , नारळाचे तेल आणि अंड्याचा पिवळा भाग एकत्र करा.
याचे मिश्रण केसांना मुळापासून लावा आणि काही वेळ तसेच ठेवा. हा नैसर्गिक हेअर मास्क साधारण ४० ते ४५ मिनिटांने धूवा.
त्यानंतर केसांवर सिरम लावा. तुमचे केस अशा पद्धतीने घरच्याघरी पार्लरप्रमाणे सिल्की स्मूथ झालेले दिसतील.