Model Anjali Varmora dies by suicide in Surat after posting an emotional reel; police suspect mental stress, no suicide note found. Saam TV News Marathi
देश विदेश

प्यार खो गया है तो...२३ वर्षीय मॉडलने केली आत्महत्या, शेअर केला अखेरचा रील

Surat model Anjali Varmora suicide case full details : “मैं तुम्हारे लिए कुछ भी नहीं…” ही रील पोस्ट करत सूरतमधील २३ वर्षीय मॉडेल अंजली वर्मोराने आत्महत्या केली. पोलिसांना सुसाइड नोट मिळालेली नसली तरी तिच्या मानसिक तणावाचा संशय व्यक्त केला जात आहे.

Namdeo Kumbhar

Surat Model Suicide : मैं तुम्हारे लिए कुछ भी नहीं… अशी रील पोस्ट करत एका मॉडेलने गळफास घेत आयुष्य संपवलं. सूरतमधील या मॉडेलच्या आत्महत्यामध्ये एकच खळबळ उडाली. २३ वर्षीय मॉडलचे नाव अंजली वरमोरा असे आहे. तिने मृत्यूपूर्वी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या रीलमुळे सूरतमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली. "आज मुझे एहसास हुआ कि मैं तुम्हारे लिए कुछ भी नहीं हूं. इससे कोई फर्क नहीं पड़ता कि सब कुछ खो गया, लेकिन अगर प्यार खो गया है तो दुख होता है." अंजली दररोज इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर रील्स पोस्ट करत होती. पण आत्महत्येपूर्वीच्या रिल्समुळे खळबळ उडाली आहे.

पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की, अंजली मानसिक तणावातून जात होती. तिच्या घरातून अथवा मोबाईलमधून कोणतेही सुसाइड नोट सापडलेले नाही. पोलिसांनी तिचा मोबाइल फोन ताब्यात घेतला असून तपास सुरू केला आहे. अंजलीच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जात आहे. पोलिस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत असून तिच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत.

दोन वर्षांपूर्वी साखरपुडा -

इंडिया टीवीच्या रिपोर्ट्सनुसार, २३ वर्षीय अंजली नवसारी बाजारातील कार्तिक अपार्टमेंटमध्ये आपली आई, भाऊ आणि बहिणीसोबत राहत होती. ती मॉडेल म्हणून विविध कंपन्यांसाठी काम करत होती. गेल्या काही महिन्यांपासून ती एका मॉडेलिंग एजन्सीसाठी काम करत होती आणि यासाठी ती सूरत आणि अहमदाबादला कामानिमित्त जायची. दोन वर्षांपूर्वी अंजलीचा साखरपुडा झाला होता. मात्र, ७ जून २०२५ च्या रात्री तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या निधनाने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

यापूर्वीही सूरतमध्ये अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती. ३ मे रोजी मध्य प्रदेशातील १९ वर्षीय सुखप्रीत कौर ही सरोली परिसरात मृतावस्थेत आढळली होती. तपासात समोर आले की, महेंद्र राजपूत नावाच्या व्यक्तीने तिला ब्लॅकमेल आणि मानसिक त्रास दिला होता. याप्रकरणी सरोली पोलिसांनी त्याच्यावर हल्ला आणि चिथावणीखोरीचा आरोप ठेवला होता. दरम्यान, अंजलीच्या आत्महत्येने सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या तरुणाई मधील मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिस आणि प्रशासन या प्रकरणी सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Tips: अंथरूणातून उठल्यानंतर या सवयी पाळा, भविष्यात होईल फायदा

WTC Points Table: भारताच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; पाहा भारत कोणत्या स्थानावर?

Maharashtra Live News Update : विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाची काठीने बेदम मारहाण

Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवा, जाणून घ्या महत्वाच्या सोप्या टिप्स

Ladki Bahin Yojana: वेळेवर ₹१५०० मिळत नाहीत, लाडकी बहीण योजना बंद करा, राज्यातील महिलांची मागणी

SCROLL FOR NEXT