2 girls married the same boy Pakistan Youtube/@Daily Pakistan Global
देश विदेश

Viral: अजब मैत्रिची गजब गोष्ट; दोन मैत्रिणींनी एकाच पुरुषासोबत थाटला संसार, नवरोबाला लागली लॉटरी

2 girls married the same boy In Pakistan: दोघी तरुणीही चांगल्या मैत्रिणी असून त्यांना लग्नानंतरही कायम सोबत राहायचे असल्याने त्यांनी ही युक्ती लढवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुझफ्फरगड, पाकिस्तान: कोणत्याच महिलेला आपल्या सवतीसोबत संसार थाटायला आवडत नाही. तसेच आपल्या पतीचे प्रेम शेअर करायलाही कोणत्याच पत्नीला आवडत नाही. परंतु पाकिस्तानात (Pakistan) एका जोडप्याने कहरच केला आहे. दोन तरुणींनी एकाच व्यक्तीसोबत लग्न केले आहे. त्या दोघी तरुणीही चांगल्या मैत्रिणी (Best Friends) असून त्यांना लग्नानंतरही कायम सोबत राहायचे असल्याने त्यांनी ही युक्ती लढवली आहे. लग्नानंतर त्यांनी एकाच घरात आपला संसार थाटला आहे. (Pakistan Viral News)

एकाच व्यक्तीसोबत लग्न केलेल्या तरुणींचे शहनाज आणि नूर असे नावे आहेत. तरुणींनी लग्न केलेल्या तरुणाचे नाव एजाज असून तो व्यवसायाने शिंपी आहेत. हे जोडपे पाकिस्तानातील मुझफ्फरगड येथील रहिवासी आहेत. 'डेली पाकिस्तान ग्लोबल' (Daily Pakistan Global) या यूट्यूब चॅनलसोबत बोलताना शहनाजने सांगितले की, माझे सर्वात आधी लग्न एजाजसोबत झाले होते. लग्नानंतर शहनाज आपली मैत्रिण नूरपासून दूर गेली होती. मात्र, नूर अनेकदा त्यांच्या घरी तिला भेटायला जात असायची. आपल्या मैत्रिणीसोबत कायम राहता यावे यासाठी नूरने शहनाजच्या पतीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शहनाजसोबत एकाच घरात राहता येईल आणि त्यांच्यातील मैत्रीतील अंतर संपेल, हा त्या लग्नामागचा उद्देश होता. शहनाजला नूरची कल्पना आवडली आणि तिने वेळ न दवडता आपला पती एजाजसोबत लग्नासाठी मान्यता दिली.

अशाप्रकारे दोन्ही मैत्रिणींनी एकाच तरुणाशी लग्न करत एकत्र दोघी एकाच घरात राहू लागले. शहनाजला दोन मुले असून नूरला एक मुलगा आहे. या अनोख्या नात्यावर शहनाज म्हणते, मी एजाजशी भांडू शकते पण नूरसोबत कधीच नाही. कारण मी स्वतःच नूरला माझ्या घरी घेऊन आले. तसेच नूरचाही शहनाजसोबत कधीच वादविवाद झाला नाही. आम्ही तिघेही आमच्या आयुष्यात आनंदी आहोत. पती एजाजही दोन्ही पत्नींसोबत आनंदाने राहत आहे.

Edited By - Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

today horoscope: आज तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

SCROLL FOR NEXT