T 20 WORLD CUP Team India Squad / BCCI Twitter
T 20 WORLD CUP Team India Squad / BCCI TwitterSAAM T

T 20 World Cup : टीम इंडियाची आज घोषणा होण्याची शक्यता; आशिया कपमध्ये ज्याची उणीव भासली, त्यालाच मिळू शकते संधी

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच होणार आहे.
Published on

T 20 WORLD CUP Team India Squad | मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय आज, सोमवारी (१२ सप्टेंबर) टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, सोमवारी निवडणूक समितीची बैठक होत आहे. या बैठकीत टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

T 20 WORLD CUP Team India Squad / BCCI Twitter
Babar Azam Tweet : पाकिस्तानचा पराभव, पण बाबर आझमचं विराटसाठी पोस्ट केलेलं जुनं ट्विट होतंय व्हायरल

टी २० वर्ल्डकप स्पर्धेसाठी (T 20 World Cup) भारतीय संघात १५ सदस्यांची निवड होणार आहे. निवडणूक समिती सदस्य आशिया चषक स्पर्धेत श्रीलंका आणि पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचीही समीक्षा करणार आहे. सुपर ४ फेरीत भारताचा (Team India) या दोन्ही संघाकडून पराभव झाला होता. महत्वाची बाब म्हणजे टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत तेजतर्रार गोलंदाज मोहम्मद शमी याला टीम इंडियात संधी दिली जाऊ शकते. आशिया कप स्पर्धेत त्याची उणीव वेळोवेळी भासली होती.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद मिळवण्यात अपयशी ठरली. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजांनी घोर निराशा केली, असा एक सूर आहे. टीम इंडियासाठी सर्वात सकारात्मक बाब म्हणजे विराट कोहली हा फॉर्ममध्ये आला आहे.

T 20 WORLD CUP Team India Squad / BCCI Twitter
Asia Cup 2022|आशिया चषक चॅम्पियनला मिळाले इतके कोटी, वाचा कोणाला किती बक्षीस मिळाले

जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल फिट

जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल हे दोघेही टीम इंडियात वापसी करू शकतात. बुमराह आणि पटेल हे दोघेही जायबंदी असल्यामुळे आशिया कपमध्ये खेळू शकले नव्हते. क्रिकबझच्या वृत्तानुसार, दोन्ही गोलंदाज फिट झाले आहेत. बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्यांनी गोलंदाजीचा सरावही सुरू केला आहे.

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध शिखर धवनकडे नेतृत्व

भारतीय संघ टी २० वर्ल्डकप स्पर्धेआधी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध प्रत्येकी तीन टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहे. यात टीम इंडियातील सर्व नियमित खेळाडू असतील. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिकाही होणार आहे. अनुभवी सलामीवीर शिखर धवन हा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. याशिवाय हेड कोच राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत व्ही. व्ही. एस. लक्ष्मण हा प्रभारी कोच असणार आहे. रिषभ पंतला टीम इंडियाचे उपकर्णधार केले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com