Canada Plane Crashed Saamtv
देश विदेश

Canada Plane Crashed: कॅनडामध्ये विमान कोसळलं; अपघातात २ भारतीय ट्रेनी पायलटसह तिघांचा मृत्यू

Plane Crashed News: कॅनडामध्ये झालेल्या विमान अपघातात दोन भारतीयांसह तीन प्रक्षिणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.

Gangappa Pujari

Canada Plane Crashed:

कॅनडामधून एक भीषण विमान अपघाताची दुर्घटना समोर आली आहे. कॅनडामध्ये विमान कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात दोन भारतीयांसह तीन प्रक्षिणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. कॅनडमधील वँकूवरजवळील चिल्लीवॅक येथे ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कॅनडामधून (Canada) एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. कॅनडाच्या वँकूवरजवळील चिल्लीवॅक येथे विमान झाडावर कोसळल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दोन भारतीयांसह तीन प्रक्षिणार्थी वैमानिकांचा दुर्देवी मृत्यू झाला.

अभय गडरु आणि यश विजय रामुगडे अशी अपघातात मृत्यू झालेल्या भारतीय ट्रेनी वैमानिकांची नावे आहेत. दोन इंजिन असलेले कमी वजनाचे विमान पायपर पीए-३४ सेनेका, ब्रिटिश कोलंबियाच्य चेविवैक शहरातमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले.

मृत्यू झालेले भारतीय वैमानिक हे मुंबईमधील (Mumbai) असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने धाव घेत बचावकार्य सुरू केले. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबतचा तपास सध्या सुरू आहे. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: महापालिका निवडणुकीआधीच बड्या IAS अधिकाऱ्याची बदली, अविनाश ढाकणे BMC चे नवे अतिरिक्त आयुक्त

Maharashtra Politics : भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; चव्हाणांकडून बालेकिल्ल्याला खिंडार, VIDEO

Shocking: सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या, नव्या घरात घेतला गळफास; १० पानी सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण...

Vladimir Putin: परम बलशाली पुतीनची महिला ब्रिगेड, रशियातील 10 शक्तीशाली महिला

MahaYuti Face Clash: महायुतीत वाहताहेत स्वबळाचे वारे; निवडणुकीआधी भाजप-सेना युती तुटणार?

SCROLL FOR NEXT