Abdul Karim Alias Tunda Saam Tv
देश विदेश

Abdul Karim Tunda: १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

Bharat Jadhav

1993 Serial Blast Case Abdul Karim Alias Tunda:

दिल्लीतील १९९३ च्या बॉम्बस्फोटाच्या घटनेतील आरोपी अब्दुल करीम टुंडाला अजमेरच्या टाडा न्यायालयाने पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केलीय. तर या प्रकरणात इरफान आणि हमीदुद्दीनला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. टुंडाविरोधात कोणतेच पुरावे मिळाले नाहीत, असं न्यायालयाने निकाल देताना सांगितले.(Latest News)

अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर १९९३ मध्ये लखनौ, कोटा, हैदराबाद, सुरत, कानपूर आणि मुंबईच्या रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणात करीम टुंडा हा आरोपी होता. या बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला ३० वर्षांपासून चालू होता. २१ फेब्रुवारी रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने टुंडा याची निर्दोष मुक्तता केलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१९९३ मधील बॉम्बस्फोट प्रकरणात करीम टुंडा हा मास्टरमाईंड आरोपी होता. टुंडा हा दाऊद इब्राहिमचा जवळचा मानला जात होता. टुंडा त्याच्या बॉम्ब बनवण्याच्या कौशल्यासाठी ‘डॉ बॉम्ब’म्हणून ओळखला जात होता. टुंडा हा बॉम्बस्फोटातील मास्टरमाईंड आहे, असा दावा सीबीआयने मागील सुनावणीत न्ययाालयात केला होता. अब्दुल करीम टुंडा याने इतर दहशतवाद्यांना बॉम्ब बनवण्यास शिकवलं होतं. टुंडा हा निर्दोष आहे, असा दावा त्याच्या वकिलाने केला होता.

दरम्यान आज न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केल्यानंतर टुंडाचे वकील शफकत सुलतानी यांनी माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिली. अब्दुल करीम टुंडा निर्दोष असल्याचा निकाल आज कोर्टाने दिला. अब्दुल करीम टुंडाची सर्व कलमांतून आणि सर्व कायद्यांतून निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. सीबीआय अभियोक्ता टाडा, आयपीसी, रेल्वे कायदा, शस्त्र कायदा किंवा स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत कोणतेही ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर करू शकले नाहीत. आम्ही सुरुवातीपासून हेच सांगत होतो की, अब्दुल करीम टुंडा हा निर्दोष आहे. दरम्यान न्यायालायने इरफान आणि हमीदुद्दीन यांना दोषी ठरले आहेत आणि त्यांना लवकरच शिक्षा होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Maharashtra News Live Updates : पुण्यात उद्या नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT