हैदराबादमध्ये नीटच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
पुनर्परीक्षेच्या आदल्या दिवशी उचललं टोकाचे पाऊल
परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केल्याचा अंदाज
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
नीट यूजी परीक्षेची तयारी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. नीट-यूजी फेरपरिक्षेच्या एक दिवस आधी म्हणजे २० जून रोजी या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं. तेलंगणातील हैदराबाद येथे १९ वर्षीय विद्यार्थिनेने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली. याआधी हैदराबाद आणि कृष्णगिरी या जिल्ह्यात देखील नीटच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. या दोन्ही घटना ताज्या असतानाच या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मियापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी शेख सना (१९ वर्षे) या नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ती आपल्या दोन बहिणींसोबत एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. तिचे वडील शेख जाफर हुसेन हे कुवेतमध्ये नोकरी करतात. तर तिची आई १० दिवसांपूर्चवी आंध्र प्रदेशातील प्रोद्दातूर येथे गेली होती. आई घरी नसताना या विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल उचलले.
पोलिसांनी तपासानंतर सांगितले की, शैक्षणिक दबाव, कौटुंबिक अपेक्षा आणि मागील अपयशांची चिंता यांमुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे. या विद्यार्थिनीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी या विद्यार्थिनीने इंग्रजीमध्ये सुसाइड नोट लिहिली होती. त्यामध्ये तिने आपल्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, सनाने गेल्या वर्षीही नीटची परीक्षा दिली होती पण ती नापास झाली होती. त्यानंतर, तिने बराच काळ कोचिंग घेतले आणि गेल्या महिन्यात परीक्षा दिली.
सना रविवारी होणाऱ्या फेरपरीक्षेची तयारी करत होती. पण शनिवारी सकाळी नाश्ता झाल्यावर सना तिच्या खोलीत गेली. तिच्या बहिणींना वाटले की ती परीक्षेची तयारी करत आहे. पण संध्याकाळपर्यंत ती खोली बाहेर न आल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता सना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिचा मृतदेह खाली उतरवला आणि शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सनाच्या बहिणी दहावी आणि सहावीत शिकत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.