Rajsthan Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: बापरे बाप! तब्बल १८ लाखांची आलिशान कार गाढवांनी पळवली; कारण ऐकून लावाल डोक्याला हात, पाहा VIDEO

18 Lakh Car Dragged With Donkeys: सासऱ्यासमोर गाडीने दिला धोका, तरुणाने कंपनीला दाखवला चांगलाच हिसका

Gangappa Pujari

Car Dragged With Donkey Viral Video: तरुणांना असणारे आलिशान गाड्यांचे वेड काही नवे नाही. आपल्याकडे एकतरी आलिशान महागडी गाडी असावी असे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. त्यामुळेच तरुण त्यांच्या वाहनांची जिवापाड काळजी घेताना दिसतात. मात्र राजस्थानमधील एक तरुण याला अपवाद ठरला आहे. कारण या तरुणाने त्याच्या १८ लाखाच्या गाडीसोबत जे केलं आहे. ते ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू.... (Latest Marathi News)

सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून कधी राग अनावर होतो तर कधी आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये एका तरुणाने चक्क १८ लाखाची गाडी गाढवांनी ओढत काढल्याचे दिसत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, हे संपुर्ण राजस्थानच्या (Rajsthan) उदयपूरमधील आहे. त्याचं झालं अस की राजकुमार नावाच्या एका व्यक्तीने मादडीमधील श्रीरामजी हुंडई शोरूममधून क्रेटा कार खरेदी केली. या नव्याकोऱ्या कारमधून ही व्यक्ती आपल्या मुलाच्या साखरपुड्यात गेली. पण या गाडीने पाहुण्यांसमोर धोका दिला ज्यामुळे राजकुमारचा चांगलाच अपमान झाला. या बिघाडावर कंपनीकडूनही योग्य उत्तर मिळाले नाही, आणि याच रागातून त्याने कंपनीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.

याबाबत बोलताना राजकुमारने सांगितले की, त्याने हुंडईची क्रेटा कार टॉप सेकंड मॉडल जवळपास साडे अठरा लाख रुपयांना खरेदी केली होती. मात्र एक-दीड महिन्यातच कारमध्ये समस्या येऊ लागली. ज्यामुळे त्याला मुलाच्या साखरपुड्यात चांगलाच अपमान सहन करावा लागला. कारण ही महागडी कार मुलाच्या सासरच्यांसमोरच त्याची बंद झाली. ज्यामुळे त्याला राग अनावर झाला.

ज्यानंतर त्याने कंपनीला फोन केला आणि कार घेऊन जायला सांगितली. कंपनीने कार घेऊन जाण्याची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 7 असल्याची सांगितलं. आता आम्ही काहीच करू शकत नाही असं उत्तर दिलं.

आधीच अपमान त्याच कंपनीनेही अशी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने राजकुमार आणखी संतापला आणि कंपनीला अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या साखरपुड्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने आपल्या नव्या कारसमोर गाढवं बांधली आणि ते कार गाढवांनी खेचत शोरूममध्ये नेली. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video) चांगलाच व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT