150% increase in the number of diabetics in the India; See ICMR's new guidelines
150% increase in the number of diabetics in the India; See ICMR's new guidelines Saam Tv
देश विदेश

चिंताजनक! देशात मधुमेहाच्या रुग्णसंख्येत १५० टक्क्यांनी वाढ; ICMR च्या नव्या गाईडलाईन्स जारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: कोरोना महामारीची साथ मधुमेहांच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरली आहे. मधुमेहाच्या रुग्णांना कोव्हिडची लागण झाल्यास ते अधिक आजारी होऊन त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (Indian Council of Medical Research) म्हणजेच आयसीएमआरकडून (ICMR) टाइप 1 (Type 1 Diabetes) मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines for Management) जारी करण्यात आली आहेत. आयसीएमआरनुसार मधुमेह असणाऱ्या व्यक्तीला कोरोना संसर्ग (Corona) झाल्यास अधिक धोका असतो. यामुळे अशा रुग्णांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. भारतात गेल्या तीन दशकांत डायबिटीज रुग्णांची संख्या सुमारे दीडशे पटींनी वाढली आहे. (ICMR's New Guidelines On Diabetics)

हे देखील पाहा -

१० लाखाहून अधिक मुले आणि किशोरवयीन मुले टाइप-1 चे बळी आहेत

जगभरात दहा लाखांहून अधिक मुले आणि किशोरवयीन मुले टाईप-१ मधुमेहाचे बळी आहेत. 'इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन'ने नुकत्याच केलेल्या अंदाजानुसार टाइप 1 मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. टाइप 1 मधुमेह असलेल्या रुग्णांना जगण्यासाठी इन्सुलिनचा वापर आणि उपचारांची आवश्यकता असते. तसेच या आजारामुळे त्यांना कलंक, बंधने आणि अनेक प्रकारच्या गुंतागुंतीसह जगावे लागते.

भारतात मधुमेह काळजीची स्थिती काय आहे?

भारतातील मधुमेहची स्थिती अनेक गुणवत्ता आणि अनेक घटकांवर अवलंबून असते. जसे की सेवांची उपलब्धता, औषधांची किंमत, काळजी पुरवठादारांची वृत्ती आणि वागणूक, मधुमेहाचे ज्ञान आणि तज्ञांचा अभाव, प्रमाणित प्रयोगशाळांचा अभाव आणि उपचार मार्गदर्शक तत्त्वे. तथापि, टाइप 1 मधुमेह व्यवस्थापनासाठी अनेक आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे आहेत.

गेल्या तीन महिन्यांत प्रथमच संसर्गाची दैनंदिन आकडेवारी पुन्हा ४००० चा टप्पा ओलांडत आहेत म्हणजे कोराना रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना, तज्ञ सर्व लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देतात. कोविड-19 पासून टाइप-1 मधुमेहाच्या रूग्णांना संरक्षणाकरीता ICMR ने काय सूचना दिल्या आहेत, ते जाणून घेऊ या.

1. भारतातल्या तरुणांमध्ये डायबेटिसबद्दचा तणाव वाढत आहे.

2. टाईप-१ डायबेटिस हा लहान मुलं आणि किशोरवयीन

3. डायबेटिसच्या बाबतीत न्याय उपचारपद्धतीसमोर काही आव्हानं आहेत.

4. काही बाबींवर नियंत्रण आल्यास डायबेटिसला नियंत्रणात आणता येतं.

5. चांगल्या पद्धतीनं नियोजन केल्यास आयुष्याची गुणवत्ता सुधारते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT