नवसंजीवनी! कॅन्सर होणार बरा, सहा महिने उपचारानंतर रुग्ण ठणठणीत!

या चाचणीमध्ये सहभागी असलेल्या सर्व 18 रुग्णांमध्ये कर्करोगाच्या गाठी पूर्णपणे नष्ट झाल्याचे आढळून आले.
Cancer Treatment
Cancer TreatmentSaam Tv
Published On

वैद्यकीय विश्वातील एका नव्या चमत्काराने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. गुदाशयाच्या कर्करोगाच्या (Rectal cancer) काही रुग्णांवर विशिष्ट औषधाच्या क्लिनिकल चाचण्या केल्या जात होत्या. डॉक्टरांनी केलेल्या या प्रयोगामुळे त्यांचा कर्करोग प्रायोगिक उपचारांनी नाहीसा झाला आहे. या औषधामुळे सहा महिन्यांनंतर त्या सर्वांच्या शरीरामधील कॅन्सचा ट्यूमर गायब झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कर्करोगाच्या (Cancer) रुग्णांसाठी ही मोठी बातमी आहे.

या चाचणीमध्ये सहभागी असलेल्या सर्व 18 रुग्णांमध्ये कर्करोगाच्या गाठी (Tumor) पूर्णपणे नष्ट झाल्याचे आढळून आले. हा अभ्यास न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासाचे लेखक आणि न्यूयॉर्कमधील मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरचे डॉ. लुईस ए डियाझ यांनी याबद्दल सांगितले की, आजपर्यंत असा कोणताही अभ्यास झालेला नाही ज्यामध्ये असा दावा केला जाऊ शकतो की एखाद्या उपचाराने कोणत्याही रुग्णाचा कर्करोग पूर्णपणे बरा झाला आहे.

Cancer Treatment
बीड अवैध गर्भपात प्रकरण: एजंट महिलेच्या बंगल्यात सापडलं गर्भपाताचं साहित्य, सोनोग्राफीचं जेल

अभ्यास काय म्हणतो?

18 रुग्णांवर केलेला हा अभ्यास खूपच कमी होता. या अभ्यासात सहभागी असलेल्या सर्व रुग्णांनी एकच औषध घेतले होते. पण अभ्यासाचे निष्कर्ष हे धक्कादायक होते. चाचणीत सहभागी असलेल्या प्रत्येक रुग्णाच्या शरीरातून कर्करोग पूर्णपणे नाहीसा झाला होता. कोणत्याही रुग्णाची शारीरिक तपासणी, एन्डोस्कोपी, पीईटी स्कॅन किंवा एमआरआय ते स्कॅनमध्ये दिसून आले नाही. तर यावर डॉ डियाझ म्हणाले, 'मला वाटते की कर्करोगाच्या अभ्यासातील इतिहास ही पहिलीच वेळ आहे.'

...अन् कर्करोगाचे ते रुग्ण आनंदाने रडू लागले;

गुदद्वाराच्या कर्करोगाच्या रुग्णांना केमोथेरपी, रेडिएशन आणि अनेक प्रकारच्या शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागते. तसेच त्यांना अनेक आतड्यांसंबंधी, मूत्र आणि यासंबंधी लैंगिक आजार होतात. तर, काहींना कोलोस्टोमी बॅग देखील बसवावी लागते. अभ्यासात सहभागी असलेल्या या सर्व रुग्णांच्या मनात भीती होती की, एकदा ही चाचणी झाली की त्यांना पुन्हा या सर्व प्रक्रियेतून जावे लागणार आहे. तर अनेकांना त्यांचा ट्यूमर पूर्णपणे नाहीसा होईल अशी देखील अपेक्षा नव्हती. परंतु या वैद्यकीय चाचणीच्या निकालांनंतर त्यांना आश्चर्य वाटले की आता त्यांना इतर उपचारांची गरज राहिलेली नाही. कर्करोगातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर या रुग्णांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.

या औषधाने केली कमाल;

ट्रायलमध्ये सहभागी असलेल्या सर्व रुग्णांना डॉस्टारलिमॅब (Dostarlimab) नावाचे औषध देण्यात आले होते. हे औषध सहा महिन्यांसाठी दर तीन आठवड्यांनी रुग्णांना दिले जात असे. हे औषध कर्करोगाच्या पेशींना उजागर करते, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास त्यांना ओळखण्यास आणि नष्ट करण्यास मदत करते. या औषधामुळे रुग्णांमध्ये कोणताही विशिष्ट दुष्परिणाम (Side Effect) दिसून आले नाहीत. नॉर्थ कॅरोलिना येथील लाइनबर्गर कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटरच्या डॉ. हॅना सॅनॉफ म्हणाल्या, 'हा अभ्यास छोटा आहे पण खूप प्रभावी आहे. हा उपचार आशादायक दिसत आहे. मात्र, रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत की नाही हे स्पष्ट अजून झालेले नाही, असे त्या म्हणाल्या. म्हणून हा अभ्यास कर्करोगावर पूर्णपणे मात करेल की नाही पुन्हा पाहण्यासाठी करण्याची चाचण्या, संशोधन आणि अभ्यास करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Cancer Drug Dostarlimab)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com