Girl Died Due To Heart Attack  Saam Tv
देश विदेश

Girl Died Due To Heart Attack : घरातील हसरा चेहरा हरपला! 13 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Heart Attack News : वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी तिची प्राणज्योत मालवल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Shivani Tichkule

Telangana News : गेल्या काही महिन्यांपासून भारतात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अगदी तरुण वयात देखील याचे बळी ठरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशीच एक घटना महबूबाबाद जिल्ह्यातील मरीपेडा मंडलातील अब्बापलेम गावात घडली आहे. एका 13 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

बोडा श्रावंती असे या चिमुकलीचे नाव आहे असून ती सहावीत शिकत होती. मुलीचे आई-वडील शेतकरी आहेत. गुरुवारी संध्याकाळी श्रावंतीला श्वास घेण्यास त्रास होत होता. तिने तातडीने याबाबत आपल्या आजीला सांगितले. त्यानंतर मुलीला डॉक्टरांकडे (Doctor) नेणारच त्यापूर्वीच ती खाली पडली आणि गावात तिच्या आजी-आजोबांच्या घरात तिचा मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी तिची प्राणज्योत मालवल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Telangana News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री झोपल्यानंतर श्रावंतीला काही तासांनी जाग आली. तेव्हा तिला श्वास घेण्यास त्रास होत होती. तिने आपल्या आजीला छातीत दुखत असल्याचे सांगितले. कुटुंबातील सदस्य तिला डॉक्टरांकडे नेणारच तितक्यात ती खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला.

मुलीला सीपीआर देऊन उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. अवघ्या १३ वर्षीय श्रावंतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही बातमी गावात पसरताच गावात शोककळा पसरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

SCROLL FOR NEXT