Corona News Updates Saam Tv
देश विदेश

मोठा दिलासा! सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट

देशात सध्या 76,700 इतके कोरोना रुग्ण सक्रिय आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना (Corona) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दैनंदिन कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. देशभरात कोरोनाच्या नवीन रुग्णात लक्षणीय वाढ झाली. मात्र, असे असले तरी दिलासादायक बाब म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. (Corona News Updates)

हे देखील पाहा -

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे तब्बल 12 हजार 781 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, गेल्या 24 तासात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 8 हजार 537 रुग्णांनी संसर्गावर मात केली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.61 टक्क्यांवर पोहोचले आहे. तर दैनंदिन सकारात्मकतेचा दर 4.32 टक्के इतका झाला आहे. देशात सध्या 76,700 इतके कोरोना रुग्ण सक्रिय आहेत.

देशात महाराष्ट्र (Maharashtra) आणि दिल्लीमध्ये (Delhi) गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात राज्यात 4004 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात 3 हजार 85 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 98.84 टक्के आहे. काही महिन्यांपासून कोरोनाचे (Corona) रुग्ण कमी झाले होते, आता पुन्हा रुग्णांत काही प्रमाणात वाढ होत आहे. तर गेल्या 24 तासात एक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 1,47,886 इतकी झाली आहे. तर राज्यात सध्या 23,746 इतके कोरोना रुग्ण सक्रिय आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT