एक मोठी बातमी समोर आली आहे. पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत या वर्षी 30 जून रोजी संपली आहे. यातच अंतिम मुदतीपूर्वी आधार कार्डशी लिंक न केल्यामुळे एकूण 11.5 कोटी पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात आले आहेत, असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) माहितीच्या अधिकाराला (RTI) दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.
द हिंदूच्या वृत्तानुसार, आरटीआयच्या उत्तरात असे म्हटले आहे की, भारतात 70.24 कोटी पॅन कार्डधारक आहेत. त्यापैकी 57.25 कोटींनी त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले आहे. 12 कोटींहून अधिक पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यात आलेले नाहीत, त्यापैकी 11.5 कोटी कार्ड निष्क्रिय करण्यात आले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मध्य प्रदेशातील चंद्रशेखर गौर यांनी ही माहिती मिळवण्यासाठी आरटीआय दाखल केला होता. यानंतर ही माहिती समोर आली आहे. नवीन पॅन कार्ड काढणाऱ्यांचे आधार-पॅन लिंकिंग आपोआप होते. मात्र 1 जुलै 2017 रोजी किंवा त्यापूर्वी पॅन कार्ड काढलेल्या विद्यमान पॅन धारकांसाठी, पॅन आणि आधार लिंक करणे आवश्यक आहे. (Latest Marathi News)
प्राप्तिकर कायद्याच्या कलम 139AA च्या उप-कलम (2) अंतर्गत, 1 जुलै 2017 रोजी पॅन कार्ड काढलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्याचा आधार क्रमांक लिंक करणे अनिवार्य आहे. आरटीआयच्या उत्तरात म्हटले आहे की, 'अधिसूचित तारखेला किंवा त्यापूर्वी पॅन आणि आधार लिंक करणे आवश्यक आहे, असे न झाल्यास पॅन निष्क्रिय होईल.' यात पुढे म्हटलं आहे की, ''कलम 234H मध्ये अशी तरतूद आहे की, जर एखादी व्यक्ती, ज्याला आपला पॅन आधारशी लिंक करणे आवश्यक आहे, ते अधिसूचित तारखेला किंवा त्यापूर्वी तसे करण्यात अयशस्वी झाल्यास, त्याला शुल्क भरावे लागेल.''
पॅन कार्ड पुन्हा सक्रिय करण्यासाठी 1,000 रुपयांचा दंड भरावा लागतो. गौर यांनी प्रश्न उपस्थित केला की, 'नवीन पॅनकार्ड बनवण्याची किंमत वस्तू आणि सेवा कर वगळून 91 रुपये आहे. मग सरकार पॅनकार्ड पुन्हा सक्रिय करण्यावर 10 पट दंड कसा काय लावू शकते? याशिवाय ज्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले आहे ते आयकर कसा भरणार?'' गौर पुढे म्हणाले की, 'सरकारने पुनर्विचार करावा आणि पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत किमान एक वर्षाने वाढवावी.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.