मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. यामुळे शहरातील प्रदूषण पातळीत काही प्रमाणात घटली आहे. याआधी बुधवारीही मुंबईत रिमझिम पाऊस पडला होता.
मुंबईसह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे. पावसाची सुरुवात झाल्यानंतर रेल्वेही थोडी मंदावली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
येत्या 24 तासांत या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान, गेल्या 24 तासात दक्षिण भारतातील अनेक भागात पाऊस पडला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी (10 नोव्हेंबर) तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि केरळमध्ये पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमधील वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद झाली. (Latest Marathi News)
तीन राज्यांत मुसळधार पाऊस
गेल्या 24 तासांत तामिळनाडू येथील किल कोटागिरी इस्टेट येथे 23 सेमी, केरळमधील कन्नूर येथे 16 सेमी, कर्नाटक येथील बलेहोन्नूर येथे 9 सेमी आणि गूटी येथे 7 सेमी पाऊस पडला आहे.
पुढील २४ तासात हवामान कसे राहील?
स्कायमेट हवामानानुसार, पुढील 24 तासांत दक्षिण-मध्य महाराष्ट्रात, केरळ, कर्नाटक, दक्षिण कोकण, गोवा आणि तामिळनाडूमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. लक्षद्वीप, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तसेच मुझफ्फराबाद, लडाख, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम राजस्थान, हरियाणा, सिक्कीम आणि आसाममध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.