MPs MLAs party change  Saam TV
देश विदेश

खासदार-आमदारांची पळवापळवी! २०२२ पासून १११ नेत्यांनी बदलला पक्ष, भाजप दुसऱ्या क्रमांकावर; आकडेवारी पाहून चक्रावून जाल

ADR report : २०२२ पासून १११ खासदार आमदारांनी पक्ष बदलला, ADR च्या अहवालातील खासदार आमदारांच्या पक्षांतराची आकडेवारी, भाजपमध्ये २९ खासदार आमदारांचे पक्षांतर, NPF BJP NCPI मध्ये गेलेल्या लोकप्रतिनिधींची संख्या, महाराष्ट्रातील सहा खासदारांचे पक्षांतर ADR अहवाल

Namdeo Kumbhar

MPs MLAs party change : देशातील राजकारणात नेत्यांचे पक्ष बदलण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. २०२२ पासून तब्बल १११ खासदार आणि आमदारांनी (MPs and MLAs) आपापले पक्ष बदलले आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालातून ही खळबळजनक माहिती समोर आली आहे.

आमदार-खासदारांच्या पक्षांतराचा सर्वात जास्त फायदा नागालँडमधील 'नागा पीपल्स फ्रंट' (NPF) या पक्षाला झाला आहे. त्यांनी सर्वाधिक पक्षांतर करणारे नेते आपल्या पक्षात घेतले आहेत. तर या यादीत भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणुका जिंकण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी नेत्यांची पक्षांतराची ही मालिका अजूनही सुरूच असल्याचे या अहवालावरून स्पष्ट होत आहे.

ADR आणि NEW (नॅशनल इलेक्शन वॉच) यांच्या रिपोर्ट्सनुसार, २०२२ ते २०२६ या काळात निवडून आल्यानंतर तब्बल १११ विद्यमान खासदार आणि आमदारांनी पक्ष बदलले आहेत. २४ सप्टेंबर रोजी याबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात २०२२ नंतर निवडणुका आणि पोटनिवडणुकांचा समावेश आहे. त्यानंतर २६ लोकसभा खासदार, सात राज्यसभा खासदार आणि ७८ आमदारांनी पक्ष बदलला आहे.

१७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १११ नेत्यांनी निवडून आल्यानंतर पक्षांतर केलेय. त्यात नागालँडमध्ये सर्वाधिक ३२ प्रकरणे आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये २०, तेलंगणामध्ये ९ आणि गोवा व पंजाबमध्ये प्रत्येकी ८ प्रकरणे आहेत. महाराष्ट्र आणि मेघालयामध्ये प्रत्येकी ६, मणिपूरमध्ये ५, अरुणाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी ४, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी २ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर कर्नाटक, मध्य प्रदेश, सिक्कीम, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी १ प्रकरण नोंदवले गेले आहे.

१११ लोकप्रतिनिधींपैकी ३२ जणांनी नागा पीपल्स फ्रंटमध्ये (एनपीएफ) प्रवेश केला. भाजपला २९, तर त्याखालोखाल नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियाला (एनसीपीआय) २०, काँग्रेसला नऊ खासदारमिळाले, तर शिवसेनेला ८ मिळाले. एनपीपीला सहा आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलला (पीपीए) चार (४ टक्के) मिळाले. एनपीएफ, भाजप आणि एनसीपीआयकडे १११ पैकी ८१ लोकप्रतिनिधी आले.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या २९ लोकप्रतिनिधींपैकी ७ राज्यसभा खासदार आणि २२ आमदार होते. सात राज्यसभा खासदार आपकडून निवडून आले होते. स्वाती मालीवाल, अशोक मित्तल, हरभजन सिंग, राघव चढ्ढा, संदीप कुमार पाठक, विक्रमजीत सिंग साहनी आणि राजिंदर गुप्ता यांचा समावेश आहे. या सात AAP खासदारांनी एप्रिल 2026 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. आमदारांमध्ये गोव्यातील आठ, गुजरातमधील चार आणि हिमाचल प्रदेशातील दोन काँग्रेस आमदारांचा समावेश होता. या अहवालात मणिपूरमधील जेडी(यू)चे पाच आमदार भाजपमध्ये गेल्याचेही नमूद आहे.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे आमदार मनोज कुमार पांडे, मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या आमदार निर्मला सप्रे आणि कर्नाटकचे आमदार जी जनार्दन रेड्डी यांचा समावेश आहे. ADR नुसार, गुजरात काँग्रेसचे चार आमदार, सी. जे. चावडा, अर्जुन मोडवाडिया, अरविंद लाडानी आणि चिराग पटेल यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर पोटनिवडणुका लढवल्या. महाराष्ट्रात ६ खासदारांनी ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मेघालयात सहा आमदारांची, तर मणिपूरमध्ये पाच आमदारांची प्रकरणे नोंदवली गेली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळ घोषणेवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया; चंद्रपूरमधील सुटलेल्या तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Good News: पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! ऑक्टोबरमध्ये मिळणार ५ महिन्यांच्या पेन्शनची थकबाकी; एकाचवेळी किती पैसे मिळणार?

Dal Makhani Recipe: हॉटेलमध्ये खाण्याची गरज नाही! अशी बनवा घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी दाल माखनी

Cheese Ball Recipe: लहान मुलांसाठी झटपट बनवा कुरकुरीत आणि चीजने भरलेले चीज बॉल्स, वाचा रेसिपी

Shocking : विद्यार्थ्याने गणिताचा प्रश्न सोडवला नाही, संतापलेल्या शिक्षकाने बेदम मारलं; संभाजीनगरमधील घटना

SCROLL FOR NEXT