Jan Dhan Accounts  Saam TV
देश विदेश

Jan Dhan Accounts : देशातील ११ लाख जनधन खाती बंद होणार; काय आहे कारण? वाचा...

देशातील जवळपास ११ लाख जनधन बँक खाती बंद केली जाणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Jan Dhan Accounts : तुम्ही जर जनधन योजनेचे बँक खाते उघडले असेल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, देशातील जवळपास ११ लाख जनधन खाती बंद केली जाणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेत दिली आहे. (Latest Marathi News)

सर्वसामान्य भारतीयांकडे बँक खाते असावे म्हणून केंद्रातील मोदी सरकारने (PM Narendra Modi) जन धन योजना आणली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्वकांक्षी योजना होती. या योजनेला अनेकांनी प्रतिसाद दिला. कोट्यवधी भारतीयांनी या योजनेअंतर्गत बँक खाती उघडली.

पण आता या योजनेतील एक चूक केंद्र सरकारच्या लक्षात आली आहे. त्यामुळे अनेक बँक खाती बंद करण्यात येणार आहे. सध्या देशभरात जनधन योजनेची जवळपास 47.57 कोटी बँक खाती आहेत. यापैकी 38.19 कोटी खाती सध्या उपयोगात आहेत. तर तब्बल 10.79 लाख नक्कल खाती आहेत. ही चूक अर्थात संबंधित यंत्रणेची आहे. त्यांनी चुकीची प्रक्रिया राबवित ही खाती उघडल्याचा दावा करण्यात आला आहे.

यावर उपाय म्हणून आता 10.79 लाख खाती बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे तुमचे हे एखादे डुप्लिकेट जनधन खाते असेल. दोन दोन खाती असतील तर त्यातील एक खाते बंद होणार आहे. केंद्र सरकार एकापेक्षा अधिक खात्यांवर ही कारवाई करणार आहे. ही कारवाई होण्यापूर्वी तुम्हीही तुमचे खाते बंद करु शकता.

काय आहे जनधन योजना?

मोदी सरकारने (PM Narendra Modi) गरीब, दुर्बल आणि ग्रामीण भागातील घटकाला बँकिंग सेवा मिळाव्यात यासाठी जन धन खाते उघडण्यासाठी मोहिम राबविली. या खात्यातंर्गत एक लाख रुपयांचा दुर्घटना विमा संरक्षण देण्यात येते. तसेच 30,000 रुपयांचा जनरल इन्शुरन्स मिळतो. या खात्यात कमीतकमी रक्कम ठेवण्याची गरज नाही. तसेच 10 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Rule: तुमची कंपनी PF खात्यात कमी रक्कम जमा करतेय का? अशा प्रकारे एका क्लिकवर तपासा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे स्व. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

फलटणच्या डॉक्टर महिलेला कोण प्रेशराइज करत होतं; साम टीव्हीच्या हाती लागलेल्या त्या पत्रात खळबळजनक माहिती

...तर फलटणच्या डॉक्टर महिलेचा जीव वाचू शकला असता

SCROLL FOR NEXT