Charlotte Chopin Awarded Padma Shri Saam Tv
देश विदेश

Charlotte Chopin : वय १०१, योग प्रशिक्षक; पद्मश्री पुरस्कारानं राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान, कोण आहेत चार्लोट चोपिन?

Charlotte Chopin Awarded Padma Shri: योगाचे महत्व साऱ्या जगभर पसरवणाऱ्या चार्लोट चोपिन यांना नुकताच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri Award) सन्मानित केले.

Priya More

एखाद्या गोष्टीची आवड जोपासण्यासाठी कोणत्याही वयाची अट नसते. तुम्ही कोणत्याही वयामध्ये काहीही करू शकता. हे सिद्ध करून दाखवले आहे फ्रान्सच्या १०१ वर्षांच्या योग प्रशिक्षक चार्लोट चोपिन (Charlotte Chopin) यांनी. वय ही फक्त एक संख्या आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. साठी ओलांडली की अनेक जण अंथरुणाला खिळून राहतात. चोर्लाट चोपिन यांनी १०१ व्या वर्षी तरुणांच्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. योगाचे महत्व साऱ्या जगभर पसरवणाऱ्या चार्लोट चोपिन यांना नुकताच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri Award) सन्मानित केले. हा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. सध्या चार्लोट चोपिन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

चार्लोट चोपिन यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीआयबी इंडियाने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी चार्लोट चोपिन यांनी साडी नेसली होती. शार्लोट चॉपिन या मूळच्या फ्रान्सच्या आहेत. योग क्षेत्रात त्या चार दशकांहून अधिक काळ काम करत आहेत. १०१ वर्षांच्या असताना देखील त्या सर्वात कठीण योगासने अगदी सहजपणे करू शकतात.

चार्लोट चोपिन या वयाच्या ५० व्या वर्षांपासून योग अभ्यास करत आहेत. त्या १०१ वर्षांच्या असल्या तरी देखील जसजसे वय वाढत चालले आहे तसतसे त्यांची योग आणि फिटनेसची आवड आणखी वाढत चालली आहे. एका ठराविक वयानंतर अनेकांचे शरीर काम करणं बंद करतात, अनेक जण एकाच ठिकाणी अथरुणावर झोपून असतात. त्या वयामध्ये चार्लोट चोपिन या योग प्रशिक्षक बनून त्या लोकांना योगाचे धडे देत आहेत. चार्लोट या आपल्या चांगल्या आरोग्य आणि दीर्घायुष्याचे श्रेय योगाला देतात. योगामुळे फक्त शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही निरोगी झाल्याचे चार्लोट सांगतात. योगामुळे त्यांना शांतात आणि स्थिरता मिळाली.

चार्लोट चोपिन यांनी १९८२ मध्ये फ्रान्समध्ये योग शिकण्यास सुरूवात केली. अल्पावधितच त्यांनी फ्रान्समध्ये योगाचे महत्व निर्माण केले. आज फ्रान्समध्ये योग हा देशातील मुख्य फिटनेस म्हणून ओळखला जातो. त्यांचा जन्म जर्मनीत झाला. ५० वर्षांपूर्वी त्यांनी एका मैत्रिणीच्या सल्ल्याने योग अभ्यास सुरू केला. तेव्हापासून त्या सतत योगा करत आहेत. योगाच्या टॅलेंटमुळे त्यांना फ्रान्समध्ये चांगली प्रसिद्धी मिळाली.

चार्लोट यांचे टॅलेंट पाहून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदी मागच्या वर्षी फ्रान्स दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पॅरिसमध्ये चार्लोट यांची भेट घेतली. या भेटीचा उल्लेख पीएम मोदींनी आपल्या ट्विटमध्ये देखील केला होता. पीएम मोदी चार्लोट यांच्यामुळे खूप प्रभावित झाले आणि त्यांनी 'मन की बात' कार्यक्रमातही त्यांचा उल्लेख केला होता. पीएम मोदींनी चार्लोट यांच्या कामगिरीचे देखील खूप कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: कावळा काळ्या रंगाचाच का असतो? जाणून घ्या या प्रश्नाचे आश्चर्यकारक उत्तर

Maharashtra Live News Update: मुलुंडमधील काही भागांत आज पाणीपुरवठा बंद!

Maharashtra Monsoon Alert : मुंबई, कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या सविस्तर

Ration Card Fraud: बोगस रेशन कार्ड वाटप, १०० लोकांकडून प्रत्येकी ३००० उकळले, अकोल्यातील घटनेने राज्यात खळबळ

Eknath Shinde : निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, महायुतीत आणखी एका पक्षाची एन्ट्री

SCROLL FOR NEXT