Mexico Gun Firing
Mexico Gun Firing Saam Tv
देश विदेश

Mexico Gun Firing: अमेरिका पुन्हा हादरली; मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार, 10 जणांचा मृत्यू

Shivani Tichkule

Mexico Gun Firing Today: अमेरिकेत गोळीबाराच्या घटना काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरली आहे. मेक्सिकोमध्ये एका अज्ञात व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला.

या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर 9 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. मेक्सिकोच्या बाजा कालिफोर्नियामध्ये ही घटना घडली आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाजवळ असलेले हा परिसर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी ओळखला जातो. (Latest Marathi News)

मेक्सिकोच्या (Mexico) बाजा कॅलिफोर्नियामध्ये एका कार शोदरम्यान अचानक गोळीबार झाला. यात 10 रोड रेसर्स ठार झाले आहेत. मृत्यू झालेल्यांची ओळख अद्याप पटलेली नसून गोळीबारात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. या आठवड्यात मेक्सिकोमध्ये झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एका पोलिसाचाही सहभाग होता. फार्मिंगटन शहरात हा गोळीबार झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार दुपारी दोनच्या सुमारास काही लोक लांब बंदुकांसह एका व्हॅनमधून आले आणि गोळीबार सुरू केला. या घटनेबाबत अटॉर्नी जनरल इवान कारपियो यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या तपासासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे.

तसेच ठार झालेल्यांची ओळख अद्याप पटलेली नसून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. गोळीबारात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: वाढलेला आकडा आला कुठून? मतदानाच्या टक्केवारीवरून संजय राऊतांचा गंभीर आरोप

IPL 2024 Points Table: चेन्नईला नमवत पंजाबची गुणतालिकेत मोठी झेप!या संघांचं टेन्शन वाढलं

Kalyan Shiv Sena News | ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाचा शिंदे गटात जबरदस्तीने प्रवेश?

Pune Crime: बायकोशी वाद.. चिडलेल्या जावयाने सासुच्या दुचाकीसह १५ गाड्या पेटवल्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Prakash Shendge News | सुप्रिया सुळे आणि विशाल पाटील वंचित कसे? शेंडगेंचा संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT