Accident News
Accident News Saam tv
देश विदेश

भयंकर! राजस्थानमध्ये १० भाविकांना ट्रेलरने उडवले, ५ जण जागीच ठार

साम वृत्तसंथा

जयपूर : राजस्थानमधील जोधपूर विभागातील पाली जिल्ह्यात रविवारी रात्री भीषण अपघात (Accident) झाला. रामदेवराकडे पायी चालत जाणाऱ्या भाविकांना एका ट्रेलरने धडक दिली. या अपघातात ५ भाविकांचा मृत्यू झाला. पायी चालत जात असताना रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलरने भाविकांना धडक दिली. या अपघातात तीन यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला तर ६ जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर दोन भाविकांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना पाली जिल्ह्यातील रोहत पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. या मार्गावरून मोठ्या संख्येने भाविक पायी रामदेवरा येथे जात होते. यावेळी रोहत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरतीया बोर्डाजवळ भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरने धडक दिली. ट्रेलरने १० भाविकांना धडक दिली. यात तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच रोहत पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह आणि जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी भाविकांना प्राथमिक उपचारानंतर जोधपूरला हलवण्यात आले. त्यानंतर ग्रामीण पोलीस उपअधीक्षक मंगलेश चुंडावत यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.

अपघातात (Accident) मृत्यू झालेले सर्व भिलवाडा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. भीलवाडा जिल्ह्यातील रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील खेमना गावातील रहिवासी पप्पू भील आणि त्याचे साथीदार पायी रामदेवरा येथे जात होते. ते रोहत पोलीस स्टेशन हद्दीतील मुकनपुरा गावाची हद्द ओलांडत असताना मागून येणाऱ्या ट्रेलरने त्यांना धडक दिली. यामुळे पप्पू, गिरधारी आणि पवन यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांचे मृतदेह स्थानिक रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Shendge News | सुप्रिया सुळे आणि विशाल पाटील वंचित कसे? शेंडगेंचा संतप्त सवाल

Today's Marathi News Live : दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्ष वाढणार?

Weight Loss Drinks : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; ७ दिवसांत पोटावरील चरबी कमी होईल

Ujjwal Nikam Meet Raj Thackeray : उज्ज्वल निकम यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेणार? शिवतीर्थावर चर्चा सुरू

CSK vs PBKS: चेन्नईच्या पराभवाचं नेमकं कारण काय? ऋतुराज गायकवाडने केला खुलासा

SCROLL FOR NEXT