Independence Day : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिले ५ संकल्प

आज देशाला पुढे नेण्यासाठी पाच शपथ घेण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांसाठी २५ वर्षांची ब्लू प्रिंट मांडली.
Pm Narendra Modi, Independence Day
Pm Narendra Modi, Independence DaySaam Tv

नवी दिल्ली : स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. देशाला पुढे नेण्यासाठी आज आपल्याला पाच शपथ घेण्याची गरज आहे. त्यांनी देशवासियांसाठी 25 वर्षांची ब्लू प्रिंट मांडली आणि सांगितले की ही ब्ल्यू प्रिंट तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा आपण या पाच शपथ घेऊ, अस पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) म्हणाले.

Pm Narendra Modi, Independence Day
महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या नेहरू-पटेल यांच्यापुढे मी नतमस्तक: पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात देशवासियांसाठी पाच संकल्प केले.

१. विकसित भारत हा एकच संकल्प घेऊन आता भारत पुढे चालेल.

२. कोणाही भारतीयाच्या मनात गुलामीचा अंशही राहायला नको.

३. आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असायला हवा. चौथा संकल्प म्हणजे एकता आणि एकजूट.

४. १३० कोटी देशवासियांच्यात एकता असयला हवी.

५. पाचवा संकल्प म्हणजे नागरिकांचं कर्तव्य. ज्यातून पंतप्रधान, मुख्यमंत्रीही सुटू शकत नाही.

Pm Narendra Modi, Independence Day
Independence Day 2022 Live |भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर पंतप्रधान मोदींची टीका

महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या नेहरू-पटेल यांच्यापुढे मी नतमस्तक: पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. 'मी जगभरात असलेल्या भारतप्रेमींना, भारतीयांना स्वातंत्र्याच्या या अमृतोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो. महात्मा गांधींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी स्वत:ला झोकून दिले आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा माझा प्रयत्न आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) म्हणाले.

स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नेहरू, राजेंद्र प्रसाद, श्याम प्रसाद मुखर्जी, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, नानाजी देशमुख अशा असंख्य महापुरुषांसमोर नतमस्तक होण्याची आज संधी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com