Vinayak Mete: विनायक मेटेंच्या अपघातप्रकरणी मोठी अपडेट; मेटेंच्या कारशी अपघात झालेला ट्रक आणि चालक पोलिसांच्या ताब्यात

Vinayak Mete Car Accident: मीरा भाईंदर पोलिसांनी ट्रक आणि ट्रकच्या चालकाला ताब्यात घेतलं असून आता त्या ट्रक चालकाचा ताबा रायगड पोलिसांकडे देण्यात येणार आहे.
Vinayak Mete
Vinayak MeteSaam tv

सचिन कदम

रायगड: शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे काल, १४ ऑगस्टला अपघाती निधन झाले होते. काल, रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या कारने एका अज्ञात वाहनाला धडक (Car Accident) दिली होती. याप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. विनायक मेटे यांच्या कारने ज्या वाहनाला धडक दिली त्या वाहनाचा शोध मीरा भाईंदर पोलिसांना लागला आहे. मीरा भाईंदर पोलिसांनी ट्रक आणि ट्रकच्या चालकाला ताब्यात घेतलं असून आता त्या ट्रक चालकाचा ताबा रायगड पोलिसांकडे देण्यात येणार आहे. यासाठी रायगड पोलिसांचं एक पथक कासा इथं रवाना झालं आहे. (Vinayak Mete Car Accident)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, विनायक मेटे यांच्या गाडीने धडक दिलेल्या ट्रक चालकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मीरा भाईंदर हद्दतील कासा टोलनाक्यावरून गुजरातकडे जाताना हा ट्रक डिटेक्ट झाला आहे. मीरा भाईंदर ते रायगड या हद्दीत हा ट्रक दिसला होता. याप्रकरणी मीरा भाईंदर पोलिसांचं एक पथक गुजरातमधील वापीला रवाना झालं आहे. विनायक मेटेंच्या अपघाताबद्दल त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी घातापाताचा संशय व्यक्त केला होता. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघाताची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते.

विनायक मेटेंच्या कारचा हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला. तसेच अपघात झाला तेव्हा विनायक मेटे यांचा मुलगा गाडी चालवत असल्याचंही सांगितलं जातंय. अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी मात्र, उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. विनायक मेटे यांचा मुलगा देखील यावेळी त्यांच्यासोबत गाडीत असल्याने त्यालाही किरकोळ जखम झाल्याची माहिती आहे.

Vinayak Mete
शिंदे सरकारच्या खातेवाटपानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

दरम्यान, विनायक मेटेंच्या अपघाती निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. आज, सोमवारी विनायक मेटे यांचे पार्थिव मुंबईवरुन बीडमध्ये पहाटे ३ वाजता दाखल झाले आहे. शहरातील तुकाई निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. पहाटे पासूनच अंत्यदर्शनासाठी लोकांची रीघ लागली आहे. साडेआठपर्यंत पार्थिव घरीच असेल, त्यानंतर त्यांच पार्थिव शिवसंग्राम भवन येथे आणण्यात येईल आणि सकाळी साडेदहा वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com