California Shooting Saam Tv
देश विदेश

California Shooting : अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; १० जणांचा जागीच मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO समोर

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे.

वृत्तसंस्था

California Shooting News : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये पुन्हा एकदा अंदाधुंद गोळीबाराची घटना समोर आली आहे.  या गोळीबारात १६ जणांना गोळ्या लागल्या असून त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसराची नाकाबंदी केली. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये चिनी नववर्षाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात काही अज्ञातांनी गोळीबार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, मॉन्टेरी पार्कमध्ये चिनी नववर्षाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रमस्थळी अचानक गोळीबार सुरू झाला. ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली असल्याची माहिती आहे. या गोळीबारात १६ जणांना गोळी असून १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये घटनास्थळी आपत्कालीन कर्मचारी जखमींवर उपचार करताना आणि पोलीस (Police) रस्त्यावर गस्त घालताना दिसत आहेत.

घटनास्थळी मोठ्या आवाजात गाणी लावण्यात आली होती. त्यामुळे गोळीबार झाल्याचं लोकांना कळालं नाही. पण जेव्हा लोकांनी धावपळ करायला सुरुवात केली, त्यानंतर परिसरात गोळीबार झाल्याची माहिती उघडकीस आली. हा हल्ला नेमका कुणी आणि का केला याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. स्थानिक पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आज अश्रू अनावर....

Curd With Salt Or Sugar : दह्यात साखर मिसळून खावं की मीठ? जाणून घ्या आरोग्यासाठी फायदेशीर काय

Coastal Road : मुंबई कोस्टल रोडला १ वर्ष पूर्ण! २४ तास सेवेमुळे वाहनांचा वेग वाढला; आकडा वाचून चक्रावून जाल

Diamond Mangalsutra Designs: डायमंडच्या साडीवर उठून दिसतील डायमंडचे मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

Ganeshotsav : गणपती उत्सवासाठी गावी जाताना भीषण अपघात, १० जण गंभीर; मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT