Madhya Pradesh Police bus Accident  saam Tv
देश विदेश

Madhya Pradesh Police: इलेक्शन ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या बसला अपघात; १० पोलीस कर्मचारी जखमी

Madhya Pradesh Police: छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात रविवारी मतदानाच्या ड्युटीला जाणाऱ्या बसला अपघात झालाय. यात १० पोलीस कर्मचारी जखमी झालेत.

Bharat Jadhav

छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात रविवारी मतदानाच्या ड्युटीला जाणाऱ्या बसला अपघात झालाय. जात असलेली बसचा उलटून अपघात झाला. या अपघातात मध्य प्रदेशातील किमान १० पोलीस कर्मचारी जखमी झालेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हे सर्व जखमी जवान सीआरपीएफचे असल्याचे एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तर जगदलपूरच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, झालेले पोलीस कर्मचारी जखमी मध्यप्रदेश पोलिसांचे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात गीडाम-जगदलपूर मार्गावरील रायकोट गावाजवळ झाला. बस्तर येथे १९एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान झाले. येथील मतदानाच्या कर्तव्य बजावून सुरक्षा कर्मचारी महासमुंद लोकसभा मतदारसंघातील गरिबंद होणाऱ्या मतदानाच्या कर्तव्यासाठी जात होते. येथे २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मध्य प्रदेश पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस गुराढोरांना वाचवताना उलटली. बस चालकाला अचानकपणे रस्त्याच्या कडेला असलेल्या गुराढोरं दिसली त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात बस पलटी झाली. या अपघाता १० पोलीस कर्मचारी जखमी झाले.

स्थानिक पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिकेतून जगदलपूर येथील डिमरपाल येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यातील ५ जणांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर इतरांना प्राथमिक उपचार मिळाल्यानंतर सोडून देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT