1 Crore Salary For Dog Care Saam TV
देश विदेश

1 Crore Salary For Dog Care: कुत्र्याचा संभाळ करण्यासाठी मोठी भरती; कर्मचाऱ्याला मिळणार तब्बल १ कोटी रुपये पगार

ज्यांच्याकडे नोकरी आहे ते आणखी जास्त पगाराच्या नोकरीसाठी धडपड करतात.

साम टिव्ही ब्युरो

Dog Care 1 Crore Salary: सध्याच्या घडीला बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. उच्च शिक्षित असून अनेक तरुणांच्या हाती नोकरी नाही. अशात ज्यांच्याकडे नोकरी आहे ते आणखी जास्त पगाराच्या नोकरीसाठी धडपड करतात. त्यामुळे अशा सर्व तरुणांसाठी एक अजब आणि नशिब पालटणारी भरती समोर आली आहे. या नोकरीची सर्व माहिती या बातमीतून जाणून घेऊ. (Latest Marathi News)

करोडपती व्हायचंय?

जर तुम्हीही करोडपती व्हायचं स्वप्न पाहत असाल तर ही भरती खास तुमच्यासाठीच आहे. कारण या भरतीमध्ये चक्क १ कोटी रुपये पगार देण्यात येणार आहे. यात फक्त तुम्हाला कुत्र्याचा संभाळ करायचा आहे. कुत्र्याचा संभाळ (Dog Care) करण्यासाठी एका कुटुंबाने ही भरती काढली आहे.

नोकरीचं ठिकाण काय?

काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नोकरीचं ठिकाण लंडन (London) आहे. फायटरफौक्ट्स आणि केसिंग्टन येथे असलेली भरती एजन्सी जॉर्ज राल्फडन यांच्यामार्फत या भरतीची जाहिरात देण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीसाठी तुम्हाला लंडन गाठावं लागेल.

पगारासोबत विविध सुविधा

येथे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला पगारासह विविध सुविधा देखील दिल्या जातील. त्या व्यक्तीची राहण्याची व्यवस्था, तिन्ही वेळचे पौष्टिक जेवण मिळेल. इतकेच नाही तर दर वर्षी ६ आठवडे म्हणजे ४२ दिवसांची सुट्टी दिली जाणार आहे. तसेच कुत्र्यासह प्रायवेट जेटमध्ये फिरण्याची संधी देखील मिळेल.

पात्रता काय आहे?

येथे नोकरी (Job) मिळवण्यासाठी विशेष डिग्रीची आवश्यता नाही. मात्र तुम्हाला कुत्र्यांचा संभाळ करता आला पाहिजे. तुम्हाला तुमच्या खाजगी आयुष्यापेक्षा कुत्र्यांना जास्त महत्व द्यावे लागेल. लंडनमध्ये राहणाऱ्या एका अरबपती कुटुंबाकडे दोन कुत्रे आहेत. त्यांचा संभाळ करण्यासाठी त्यांनी भरती काढलीये. अनेक माध्यमांवर ही माहिती देण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीत 'इंडिया'-भाजप आमनेसामने; रामलीलावर इंडिया आघाडीचा महामोर्चा

महादेव बेटिंगचा किंग अखेर भारतात! CBI ची मोठी कारवाई! आता होणार मोठे खुलासे?

मंत्री पंकजा मुंडे बनल्या मॉडेल! पंकजाताईंचा रॅम्प वॉक पाहिला का?

Cotton Saree Designs For Women: दिवाळीसाठी कॉटनच्या साड्या डिझाईन्स, लेटेस्ट 5 पॅटर्न्स

उत्तर प्रदेशात निवडणुकीची तयारी नेमकी कुठपर्यंत? आयोग घेणार 18 जिल्ह्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT