Avantika Express Viral Video: भारतीय रेल्वेचा फज्जा; न मागता प्रवाशांना मिळाली शॉवरची मज्जा, पाहा VIDEO

मात्र स्लिपर ट्रेनमध्ये देखील पाणी गळत असेल तर नागरिकांनी प्रवास कसा करावा असा प्रश्न उपस्थित होतोय.
Avantika Express Viral Video
Avantika Express Viral VideoSaam TV

Viral Video: देशभरात पावसाने हजेरी लावली आहे. पहिला पाऊस म्हणून नागरिक काही प्रमाणात सुखावले असतानाच त्यांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला आहे. पावसाळ्यात ट्रेन उशिराने आणि धिम्या गतीने धावते त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतो. मात्र आता पहिला पाऊस पडताच ट्रेन गळत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. (Latest Marathi News)

भारतीय रेल्वेचा (Indian Rail) हा व्हिडिओ एका प्रवाशाने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पहिल्याच पावसात ट्रेनची दुरअवस्था झाली आहे. धावत्या ट्रेनमधून प्रवासी प्रवास (Traveling) करत असताना ती मध्येच गळू लागते. ट्रेन गळत असल्याने प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय. रात्रीच्यावेळी प्रवासासाठी नागरिक स्लिपर ट्रेनची निवड करतात. मात्र स्लिपर ट्रेनमध्ये देखील पाणी गळत असेल तर नागरिकांनी प्रवास कसा करावा असा प्रश्न उपस्थित होतोय.

Avantika Express Viral Video
Kedarnath Viral Video: देव भूमीत राक्षसी कृत्य! केदारनाथमध्ये तरुणांनी घोड्याला पाजली सिगारेट; संतापजनक VIDEO...

मुंबईपासून इंदौरपर्यंत जाणाऱ्या अवंतीका एक्सप्रेस ट्रेनमधील हा व्हिडिओ आहे. सध्या हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नागरिकांनी यावर विविध कमेंट केल्यात. भारतीय रेल्वेची अवस्था किती बिकट आहे. हे या व्हिडिओमधून समजते. ट्रेनचे छत गळत असल्याने काही प्रवाशांना पूर्ण वेळ भीजत प्रवास करावा लागला आहे.

मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून ३ दिवसच धावणार

मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन आतापर्यंत आठवड्यातून ६ दिवस धावत होती. शुक्रवारी ही एक्स्प्रेस ट्रेन बंद असायाची. मात्र मान्सूनमुळे ट्रेनचे नियमीत वेळापत्रक बदलले आहे. पावसाळ्यात मुंबईहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ही ट्रेन धावणार आहे. सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटीहून पहाटे ५.३२ वाजता सुटणार असून पुढच्या १० तासांनंतर दुपारी ३. ३० वाजता मडगावला पोहोचेल. पावसामुळे हा बदल करण्यात आला आहे.

Avantika Express Viral Video
Kedarnath Viral Video: देव भूमीत राक्षसी कृत्य! केदारनाथमध्ये तरुणांनी घोड्याला पाजली सिगारेट; संतापजनक VIDEO...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com